JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane Rain : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याही ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Thane Rain : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याही ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

जाहिरात

शाळांना उद्या सुट्टी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 20 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुक्रवारी 21 जुलै रोजी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं बंद राहीतल, असे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे गुरूवारीही मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

सिंधुदुर्गातही शाळांना सुट्टी कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना उद्या शुकवारी 21 जुलैला शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 20 ते 23 जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तत्काळ सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांना विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला असून यासंदर्भात परिपत्रकही काढल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शुक्रवारी २१ जुलै रोजी सुट्टी मिळणार आहे. मुख्याध्यापक संघटनांच्या माध्यमातून व मुख्याध्यापकांच्या माध्यमातून हा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पोचवला आहे. मुलांना सुट्टी असल्याचे आदेश पोहोचवण्यासंदर्भात माध्यमाद्वारे, वृतपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडीया व सोशल मिडीया याद्वारे कळवण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे उद्या कोणीही विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये व घराबाहेर पडू नये, अशा पद्धतीचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या