JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dombivli News : ‘बाबा डोंबिवलीत रिक्षा चालवतात, त्यांना IAS होऊन दाखवणार’ श्रावणीचं यश पाहून सगळेच भारावले

Dombivli News : ‘बाबा डोंबिवलीत रिक्षा चालवतात, त्यांना IAS होऊन दाखवणार’ श्रावणीचं यश पाहून सगळेच भारावले

डोंबिवलीतील ऑटो ड्रायव्हरच्या मुलीनं दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. त्याचवेळी तिनं नवं ध्येय सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 5 जून 2023 : दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. या परीक्षेत आपल्या बिकट परिस्थितीवर मात करत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. त्यांचं हे यश आता दाहावीला असलेल्या मुलांसाठी प्रेरणा देणारं आहे. डोंबिवलीतील एका लेकीनं आपल्या वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत दहावीमध्ये 93 टक्के मार्क्स मिळवले आहेत. कसं मिळवलं यश? श्रावणी रेपाळ असं या यशस्वी मुलीचं नाव आहे. डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर शाळेची विद्यार्थिनी असलेल्या श्रावणीचे वडील रिक्षाचालक आहेत. तर आई गृहिणी आहे. घरातील परिस्थिती बेताची असली तरी श्रावणीनं जिद्द न सोडता दहावीचा अभ्यास केला. या अभ्यासाचं वर्षाअखेर फळ तिला मिळालंय.

‘मी रोज 4 तास अभ्यास केला. अभ्यास करताना मूड फ्रेश असेल, हे पथ्य मी नेहमी पाळलं. मला आईनं अभ्यासात मदत केली. विशेषत: भाषा विषयातील प्रश्नांना तीनं मार्गदर्शन केलं. मला अभ्यासात कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी आई-बाबांनी घेतली मी आता सायन्सला प्रवेश घेणार आहे. बारावीनंतर नीटची परीक्षा द्यायची आहे. IAS ऑफिसर होणं हे माझं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी कष्ट घेणार आहे, असं श्रावणीनं सांगितलं. कुटुंबावर आलं संकट, पण ती डगमगली नाही, रिक्षा चालवून सांभाळला संसार मला श्रावणीचा निकाल कळला तेव्हा मी रिक्षा चालवत होतो. मी तिला पुन्हा फोन करून अभिनंदन केलं. यापुढे कितीही कष्ट करावे लागले तरी श्रावणीच्या पाठीशी मी भक्कमपणे उभं राहणार आहे, असं तिचे वडील रुपेश यांनी सांगितलं. तर श्रावणीच्या आईनंही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिद्द आणि चिकाटी सोडायची नाही हे श्रावणी तिच्या वडिलांकडून शिकली आहे. श्रावणीचं हे वैशिष्ट्य तिला पुढील प्रवासात मदत करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या