JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Asangaon Station : उशीर होत असल्याने मालगाडीखाली शिरून ट्रॅक ओलांडत होती नर्स, अचानक गाडी सुरू झाली अन् भयानक घडलं

Asangaon Station : उशीर होत असल्याने मालगाडीखाली शिरून ट्रॅक ओलांडत होती नर्स, अचानक गाडी सुरू झाली अन् भयानक घडलं

ट्रॅक ओलांडण्याकरता नर्स एका थांबलेल्या मालगाडीखाली शिरली आणि इतक्यात मालवाहतूक करणारी गाडी अचानक चालू लागली. या गाडीने आसनगाव स्थानकात महिलेला चाकाखाली चिरडलं.

जाहिरात

मालगाडीने महिलेला चिरडलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे 24 जुलै : कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याच्या घाईत सायन रुग्णालयात कार्यरत असलेल्या 54 वर्षीय परिचारिकेला आपला एक पाय आणि एक हात गमवावा लागला. ती ट्रॅक ओलांडण्याकरता थांबलेल्या मालगाडीखाली शिरली आणि इतक्यात मालवाहतूक करणारी गाडी अचानक चालू लागली. या गाडीने आसनगाव स्थानकात महिलेला चाकाखाली चिरडलं. ही घटना शनिवारी सकाळी 5 वाजून 44 मिनिटांच्या सुमारास घडली. परिचारिका विद्या वखारीकर कामावर जाण्यासाठी लोकल पकडण्यासाठी धावत होती, महिलेला उशीर झाला होती आणि लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती. लोकल ट्रेन निघून जाईल असा विचार करून तिने घाईत मालगाडी उभी असलेला ट्रॅक ओलांडण्याचा निर्णय घेतला. मात्र मालगाडी अचानक चालू लागली आणि महिलेला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केलं आहे. Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी शोध मोहिम थांबवली, बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार; प्रशासनाचा मोठा निर्णय आसनगावची रहिवासी असलेली ही महिला कामासाठी आसनगाव ते सायन असा रोज प्रवास करते. वखारीकर यांना तीन मुलं असून त्यांच्या पतीचा ऑटोचा व्यवसाय आहे. डॉक्टरांनी तिचे हातपाय वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या दुखापतींच्या तीव्रतेमुळे हे अवयव कापावे लागले. मालगाडी सुरू होईल हे त्या महिलेला कळलं नाही आणि ती अचानक मालगाडीखाली अडकली. दुर्दैवाने या घटनेत महिलेला तिचा डावा पाय आणि डावा हात गमवावा लागला,” असं कल्याण सरकारी रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितलं. तिला तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. ती शुद्धीवर असून पुढील उपचार सुरू आहेत. कल्याण कसारा रेल्वे कम्युटर असोसिएशनच्या सदस्य अनिता झोपे म्हणाल्या, “आसनगाव रेल्वे स्थानकाच्या मुंबईकडील बाजूला पूल नसल्यामुळे ही घटना घडली. महिलेला ट्रेन पकडण्याची घाई होती. मालगाडीखालून जाऊन पटकन रुळ ओलांडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. रेल्वेने बांधलेला पादचारी पूल फलाटाच्या मधोमध असल्याने त्याचा काही उपयोग नाही. सीएसएमटी ते स्थानकापर्यंत जाणाऱ्या बहुतेक प्रवाशांचे वारंवार अपघात होतात.” “ती परिचारिका असली तरी महिलेला स्थानिक आसनगाव ग्रामस्थ “डॉक्टर” म्हणून ओळखतात. ती अनेक वर्षांपासून सायन रुग्णालयात काम करत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात तिनेच गावकऱ्यांना अनेक गोष्टीत मदत केली. ती एक सामाजिक कार्यकर्तीदेखील होती आणि जेव्हा जेव्हा कोणत्याही वैद्यकीय सल्लााची आवश्यकता असते तेव्हा आधी गावकरी तिचा सल्ला घेतात. या घटनेबद्दल सर्वांनाच दुःख झालं आहे, ” असं झोपे म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या