भाग्यश्री प्रधान आचार्य डोंबिवली, 25 जून: रेल्वे ही प्रवासाच्या दृष्टीने सोयीची वाहतूक असल्याने अनेकजण या वाहतुकीला पसंती देत असतात. महिला ज्यावेळी एकट्या प्रवास करतात त्यावेळी महिलांसाठी वेगळ्या डब्याची सोय केलेली असते. रात्रीच्यावेळी महिला डब्यातून प्रवास करत असताना काही समाजकंटक डब्यात घुसून गैरवर्तन केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आपण डब्यात एकट्या आहात आणि असा वेगळा अनुभव येत असेल तर अशावेळी घाबरून जावू नका. तर थेट रेल्वे पोलिसांशी संपर्क साधा. नेमके काय कराल ? डब्यात एकट्या महिला असतील आणि भीती वाटत असेल तर महिलांनी जीआरपीच्या टोल फ्री नंबरवर फोन करावा. 1512 असा टोल फ्री नंबर आहे. तसेच आरपीएफचा टोल फ्री क्रमांक 139 हा असून या क्रमांकावर देखील फोन लावून मदत घेता येते, असे कल्याण स्थानकातील वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.
चेन पुलींग करावे डब्यात एकट्याने प्रवास करत असताना अचानक कोणी डब्यात शिरून त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील तर चेन पुलिंग करावे जेणे करून पुढच्या स्थानकात गाडी थांबता क्षणीच पोलीस तुमच्यापर्यंत येतील. रात्रीचा प्रवास करताना महिलांनी सेफ्टी स्प्रे जवळ बाळगावा. जेणे करून स्प्रे मारल्यानंतर समोरच्याला दोन ते चार मिनिट दिसणार नाही. या वेळेमध्ये आपण संपर्क साधू शकता. सध्या रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू सध्या अनेक प्रकार घडत असल्यामुळे जीआरपी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी त्वरित या संदर्भात पाऊले उचलली असून रात्री नऊ नंतर सीएसटीहून निघणाऱ्या सर्व लोकल मधील महिला डब्यात एक जीआरपी अनिवार्य आहे. मात्र तसे नसल्यास तुम्ही जीआरपी क्रमांकावर त्वरित फोन करू शकता. पुढील स्थानकात गाडी येईपर्यंत ज्या डब्यात गैरप्रकार घडत आहे त्याच डब्यासमोर त्वरित पोलीस असतील. फलाटावर देखील आरपीएफ तसेच जीआरपीचे पोलीस उपलब्ध असतात. छंद माझा वेगळा, जोशी काकांनी जमवल्या तब्बल 250 हून अधिक गाड्या घाबरू नका, कॉल करा महिलांनो घाबरून जावू नका. समयसूचकता दाखवून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा इतकेच नव्हे तर जीआरपीचा 1512 आणि आरपीएफचा 139 हा क्रमांक आपल्या फोन मध्येही सेव्ह करून ठेवा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.