JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dombivli News : नारळ पाणी पिऊन केला सराव, डोंबिवलीच्या इशाचा इंडोनेशियात सिल्व्हर पंच!

Dombivli News : नारळ पाणी पिऊन केला सराव, डोंबिवलीच्या इशाचा इंडोनेशियात सिल्व्हर पंच!

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाणारी डोंबिवली आता खेळाडूंची नगरीही झालीय

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डोंबिवली,  11 जुलै 2023 : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाणारी डोंबिवली आता खेळाडूंची नगरीही झालीय. अनेक डोंबिवलीकर खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान उंचावलीय. इंडोनेशियामध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड किंग बॉक्सिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या इशा भगतनं उपविजेतेपद मिळवलंय. फक्त नारळ पाणी पिऊन सराव करणाऱ्या इशानं तिच्या यशाचं रहस्य सांगितलंय. इंडोनेशियात झालेल्या अंडर 20 बॉक्सिंग स्पर्धेत एकूण 24 देश सहभागी झाले होते. या स्पर्धेत इशानं फायनलपर्यंत धडक मारली होती. फायनलमध्ये रशियन खेळाडूनं इशाचा पराभव केला. या स्पर्धेत विजेतेपद हुकलं असलं तरी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं इशाचं स्वप्न आहे. त्यासाठी तिनं सरावही सुरू केलाय. इशानं आत्तापर्यंत एकूण 162 पदकं, 20 पेक्षा जास्त ट्रॉफी आणि 200 पेक्षा जास्त प्रमाणपत्र मिळवलीत.

नारळ पाणी घेऊन सराव ‘खेळासाठी अनेकवेळा घरातील काही कार्यक्रम किंवा सण उत्सव बाजूला ठेवावे लागतात त्यावेळी वाईट वाटतं. अनेक‌ क्षण असे येतात की आता पुढे खेळू नये असे वाटू लागते. मात्र या सर्वांवर मात करून जेव्हा तुम्ही काहीतरी करू पाहता तेव्हा तुम्ही ध्येयापर्यंत पोहचता,’ असं इशानं सांगितलं. नागपूरच्या ऋषिकाची भरारी, चीनमधील स्पर्धेत करणार देशाचं प्रतिनिधित्व, Video बॉक्सिंग स्पर्धेच्या तयारीसाठी इशा खूप मेहनत घेतली. ती सुरूवातीला एकच वेळ जेवत होती. त्यानंतर फक्त नारळ पाणी पिऊन सराव केला, असं तिची आई हेमांगी भगत यांनी सांगितलं. डोंबिवलीच्या श्याम श्री कुमार यांच्या अर्बन अखाडा अकादमीमध्ये इशा प्रशिक्षण घेत आहे. तिचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणा असल्याचं मत तिचे मामा विशाल पाटील यांनी व्यक्त केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या