नागपूर, 7 जुलै : प्रत्येक क्षेत्रात आता महिलांनी आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवलाय. क्रीडा क्षेत्रातही महिला देशाचं नावं मोठं करत आहेत. नागपूरची जलतरणपटू ऋषिका बडोलेची चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी निवड झालीय. नुकत्याच बंगळुरूमध्ये झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी ट्रायल्समध्ये ऋषिकानं जोरदार कामगिरी केलीय. या कामगिरीच्या जोरावर तिची भारतीय टीममध्ये निवड झालीय. चीनमधील चेंगडूमध्ये 28 जुलैपासून वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स सुरू आहेत. या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणारी ऋषिका ही नागपूरची दुसरी जलतरणपटू आहे. जैन युनिव्हर्सिटी, बेंगळुरूचे प्रतिनिधित्व करणारी ऋषिका 50 आणि 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.
ऋषिका गेल्या पाच वर्षांपासून तिच्या कामगिरीत सातत्य ठेवत असून राष्ट्रीय स्तरावर ती नियमितपणे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते. ऋषिकाने यापूर्वी खेलो इंडियासह वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला असून 200 पेक्षा जास्त पदकांची कमाई केलीय. त्याचबरोबर क्रीडाभूषण हा पुरस्कारही तिनं मिळवलाय. 1 मिनिटात समजेल धोनीचं सर्व आयुष्य, ठाण्याच्या तरुणीनं दिल्या हटके शुभेच्छा, Video ‘मी बॅचलर इन कॉम्पुयटर सायन्स हे तायवडे कॉलेज नागपूरमधून केलं. सध्या जैन युनिव्हर्सिटी बेंगळुरुमधून मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये मास्टर्स करत आहे. जलतरण हा वैयक्तिक खेळ आहे. त्यामध्ये कुणावरही अवलंबून न राहता स्वत:च्या मेहनीतवर यश मिळवता येतं. मला वडिलांनी लहाणपणी नागपूरच्या अंबाझरी तलावात ट्यूब बांधून पोहायला शिकवलं. तेव्हापासूनच मला यामध्ये आवड निर्माण झालाी. माझे आई-बाबा हे दोघेपण शिक्षक असून त्यांनी माझ्या खेळाला कायम पाठिंबा दिलाय. या खेळात देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं माझं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण होत असल्याचा मला आनंद आहे. माझ्यावर आता मोठी जबाबदारी असून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन, असं ऋषिकानं सांगितलं.