JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dombivli News : असाही रिक्षावाला... ज्येष्ठ नागरिकांसाठी करतोय मोठं काम! कारण समजल्यावर कराल कौतुक, Video

Dombivli News : असाही रिक्षावाला... ज्येष्ठ नागरिकांसाठी करतोय मोठं काम! कारण समजल्यावर कराल कौतुक, Video

रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद नवे नाहीत. पण, हा रिक्षाचालक वेगळा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली  2 जून : रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यातील वाद हे काही नवीन नाहीत. कल्याण-डोंबिवलीमध्ये तर रिक्षा चालक अवास्तव भाडं आकारण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याचवेळी डोंबिवलीमधील एक रिक्षाचालक याला अपवाद ठरतोय. रुपेश रेपाळ असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. ते राजाजी पथ परिसरात राहातात. त्यांच्या रिक्षाच्या मागे  ‘जय जवान जय किसान , इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन आर माय ब्रदर अँड सिस्टर’ हा खास संदेश लिहिला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत ही सूचनाही सर्वांचं लक्ष वेधतेय.

का घेतला निर्णय? वाढत्या महागाईमुळे सर्वजण त्रस्त आहेत. त्याचवेळी एका रिक्षाचालकानं हा निर्णय घेतल्यानं सर्वजण आश्चर्य व्यक्त करतायत. रुपेश यांनी लोकल18 शी बोलताना यामागील कारण सांगितलं. ‘कोरोनाच्या काळात मी अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. त्यानंतर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं मला वाटलं. त्यामुळे 26 जानेवारीपासून मी ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजनची एकच बाटली, वाटही चुकली पण डोंबविलीच्या ओमकारनं केलं देशातील सर्वात उंच शिखर सर, Video रुपेश यांचा पत्नी, दोन मुलं आणि आई असा परिवार आहे. ते एका भाड्याच्या घरात राहतात. रिक्षामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचं घर चालतं. डिझेल, गॅस महाग झाला असल्यानं तुम्हाला हे कसं परवडतं? असा प्रश्न त्यांना विचारला. त्याेळी माऊली मसा बुद्धी देते, त्याप्रमाणे मी वागतो. पुढच्या गोष्टी माऊली सांभाळतात. माझे घर देखील तेच सावरतात, असं त्यांनी उत्तर दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या