JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / व्हिडीओ लाईक करताच रिकामा होऊ लागतो बँक बॅलन्स, भामट्यांनी शोधला फसवणुकीचा नवा फंडा!

व्हिडीओ लाईक करताच रिकामा होऊ लागतो बँक बॅलन्स, भामट्यांनी शोधला फसवणुकीचा नवा फंडा!

यू ट्यूबवर एखादा व्हिडीओ लाईक करा तुम्हाला पैसे मिळतील, अशी ऑफर आली असेल तर सावधान!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 19 जुलै : मोबाईल आणि सोशल मीडिया वापरण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झालीय. याच गोष्टीचा फायदा आता सायबर गुन्हेगार उचलत आहेत. यू ट्यूबवर एखादा व्हिडीओ लाईक करा तुम्हाला पैसे मिळतील किंवा नोकरी लागेल असं सांगून फसवणुकीच्या प्रमाणात सध्या वाढ झालीय. ठाणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये 122 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये उच्च शिक्षित तरुणांचं प्रमाण जास्त आहे. ठाणे शहर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. कशी होते फसवणूक? व्हॉट्सअप , यू ट्यूब , टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामवरून सुरुवातीला काही मेसेज पाठवले जातात. हे मेसेज बघितल्यानंतर एका लिंक ( संकेतस्थळ ) वर क्लिक करा असे सांगितले जाते. या संकेत स्थळावर दिलेली चित्रं लाईक करा म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील असे सांगण्यात येते. सुरुवातीला काही पैसे दिले जातात. त्यानंतर विश्वास संपादन करून पैसे गुंतवा तुम्हाला त्याबदल्यात आणखी पैसे मिळतील असे सांगितले जाते. मात्र पैसे मिळत नाहीत आणि तरुण मुलं गुंतवत राहतात. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं.

फसवणुकीची उदाहरणं ठाण्यातील कोपरी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला एका अनोळखी महिलेने काही दिवसांपूर्वी व्हाट्सएप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफर्मवरून संपर्क साधला. ऑनलाइन कमिशन देणारा जॉब मिळेल. त्यावर भरपूर कमिशन मिळेल, असा दावा या महिलेनं केला होता. त्यानंतर तक्रादार यांना फी म्हणून 17 लाख 74 हजार रुपये यामध्ये ऑनलाईन माध्यमातून देण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणतंही काम किंवा कमिशन दिलं नाही. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संदेश यांनी कोपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर जडला जीव; 37 वर्षीय महिलेने रचला कट ठाण्यातल्याच तुळशीधाम येथे राहणाऱ्या  तरुणालाही एका वेबसाईटवरुन जॉब देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. यामध्ये त्याची तब्बल 8 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक केली. ठाण्यात लॉ करत असलेल्या तरुणीचीही अशाच एका प्रकरणा्त 2 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आलीय. एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तर तब्बल 84 लाखांचा गंडा घातला आहे. अशी घ्या दक्षता… या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काय करावं याबाबतच्या टिप्स पोलीस उपायुक्त पाटील यांनी दिल्या आहेत. ‘कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मेसेजला रिप्लाय देऊ नये. व्हॉट्स अप, इंस्टाग्राम , टेलीग्राम या सर्वच ठिकाणी असे मेसेज येऊ शकतात. नोकरी लावून देतो मात्र पैसे द्यावे लागतील असे सांगितले तर पैसे देऊ नका. कोणतीही कंपनी नोकरी देण्यासाठी पैसे मागत नाही हे लक्षात ठेवा. एखादी चित्रफीत पाहणे किंवा चित्रांना लाईक करणे आणि पैसे कमविणे हा एक सापळा रचला जातोय, हे ध्यानात ठेवा,’ असं पाटील यांनी सांगितलं. सध्या करत असलेल्या गले लठ्ठ पगाराच्या नोकरीची शाश्वती नसल्यानं काहीतरी जोड धंदा करावा या उद्देशाने अनेक जण या प्रलोभनाना बळी पडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या