JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maha Political Crisis : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं पारडं जड, सरन्यायाधीश अखेर स्पष्टच बोलले

Maha Political Crisis : सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचं पारडं जड, सरन्यायाधीश अखेर स्पष्टच बोलले

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. आम्हाला मर्यादेची रेषा ओलांडायची नाही. विधानसभा अध्यक्षांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्या.

जाहिरात

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. आम्हाला मर्यादेची रेषा ओलांडायची नाही. विधानसभा अध्यक्षांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्या.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : राज्यातील सत्तासंघर्षावर मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि एकनाथ शिंदे यांची निवड कशी केली याची माहिती दिली. तसंच आमदारांवर अपात्रेची कारवाई करावी आणि जुने सरकार परत आणावे, अशी मागणीही केली. पण ठाकरे गटाच्या युक्तिवादावर कोर्टाने आपलं परखड मत नोंदवलं आहे. आम्ही अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या 5 जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपने आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तीवाद केला होता. आज पुन्हा कपिल सिब्बल यांनी त्याच्या मुद्यावर युक्तिवाद सुरू केला आहे. यावेळी  जुने सरकार, जुने विधानसभा अध्यक्ष परत आणा अशी मागणीच  ठाकरे गटाने केली. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर घटनापीठ म्हणाले, तुमचं म्हणण मान्य केल्यास आमदार अपात्र होतील. मात्र, आम्ही हा निर्णय कसा घेऊ शकतो? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. आम्हाला मर्यादेची रेषा ओलांडायची नाही. विधानसभा अध्यक्षांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्या, असं कोर्टाने स्पष्ट केलं. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे हे चौथ्या क्रमांकाचे नेते होते - एकनाथ शिंदे यांची 2018 ला नेते पदी निवड झाली होती आणि ही निवड उद्धव ठाकरे यांनीच केली होती. - पक्षप्रमुख म्हणून ही निवड करण्यात आली होती. - शिवसेनेची कार्यकारिणीचा सिब्बल यांनी वाचून दाखवली. 31 ऑक्टोबर 2019 शिंदे आणि प्रभूंची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली होती. याबद्दलचा निर्णय हा अध्यक्षांना कळवला होता. - हा पक्षाचा निर्णय होता, जो उद्धव ठाकरेंनी घेतला होता. नेत्यांची निवड ही कार्यकारिणीमध्ये झाली होती. तर काही जणांची निवडणुकीतून निवड झाली - उद्धव ठाकरे यांनीच पक्षप्रमुख सर्व निर्णय घेत होते. सरन्यायाधीश : कागदपत्रावरून उद्धव ठाकरे तसे निर्णय घेतात असं दिसत नाही - राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिकार हे उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते. सरन्यायाधीश - ती बैठक फक्त निवडून आलेल्या आमदारांची होती. शिवसेनेच्या कार्यकारिणीचे कागदपत्र हे मराठीत होते. सरन्यायाधीशांनी ते पत्र वाचून दाखवले आणि इतर न्यायाधीशांनाही समजावून सांगितलं. मुख्य प्रतोद यांची निवड कशी होते, याचे वाचण करण्यात आले. सरन्यायाधीश - आमदारांनीच सर्व अधिकार हे ठाकरेंना दिले होते. सिब्बल - शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये चौधरी यांची निवड कऱण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. ही पक्षाची बैठक नव्हती, तर निवडून आलेल्या आमदारांनी घेतली. सरन्यायाधीश - हे सर्व निर्णय निवडून आलेल्या आमदारांनी घेतले मुख्य प्रतोद हे पक्षप्रमुखांना विचारूनच निर्णय घेत असतात. 22 जूनला दुसरी बैठक घेण्यात आली. ती विधिमंडळ नेत्याची बैठक होती. 22 जूनच्या बैठकीला हजर राहण्याचा व्हीप बजावला होता. सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता. तेव्हा शिंदे गटाला हा व्हीप लागू होता. सरन्यायाधीश - विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाच्या सल्ल्याने चालतो का? सिब्बल- व्हीपचा अधिकृत पत्र व्यवहार झाला होता. 22 जूनला बजावला होता, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांना माहिती होतं. शिंदेंनी व्हीपचं उल्लघन केलं. आम्हाला नव्या अध्यक्षांकडे जायचे नाही. जुन्या अध्यक्षांची निवड करा सरन्यायाधीश - आम्हाला मर्यादा रेषा ओलांडायची नाही. अध्यक्षांना ठरवू द्या. आमदारांना अपात्र ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना आहे. त्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही सिब्बल - जुन्या अध्यक्षांना पुन्हा नियुक्त करा, नबाम रेबिया प्रकरणाध्ये हाच युक्तिवाद झाला होता. तेव्हा जे झालं ते इथं झालं. तुम्ही 7 जणांच्या खंडपीठाकडे कधी पाठवणार. सरन्यायाधीश - 29 जूनला बहुमत चाचणीपुरतेच आम्ही अंतरिम आदेश दिले होते. त्यामुळे आम्ही उर्वरित गोष्टींचा आम्ही विचार करू शकत नाही. तुमचं मान्य केलं तर आमदार अपात्र ठरू शकतात. पण तो निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. हे कसं होऊ शकतं तुम्ही आम्हाला सांगा. सरन्यायाधीश - उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे अंतरीम आदेश पुढे लागू होत नाही. जुने सरकार, जुने विधानसभा अध्यक्ष परत आणा; ठाकरे गटाची मागणी 22 जून 2022 रोजी पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता. शिंदे गटालाही हा व्हीप लागू होता. याची माहिती शिंदे गटाला देण्यात आली होती. आम्ही निर्णय कसा घेऊ शकतो? - घटनापीठ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर घटनापीठ म्हणाले, तुमचं म्हणण मान्य केल्यास आमदार अपात्र होतील. मात्र, आम्ही हा निर्णय कसा घेऊ शकतो? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. आम्हाला मर्यादेची रेषा ओलांडायची नाही. विधानसभा अध्यक्षांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्या. आमच्याकडून तुम्हाला काय हवे आहे? सिब्बल - आम्हाला नव्या अध्यक्षांकडे जायचे नाही. एक तर जुने अध्यक्ष आणा किंवा 29 जूनला म्हटल्याप्रमाणे जुने सरकार आणा. 29 जूनला बहुमत चाचणीवर घटनापीठाने अंतरिम निकाल दिला होता. त्याचा दाखला कपिल सिब्बल यांनी दिला. यावर घटनापीठ म्हणाले, बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे तो अंतरिम निकाल आता लागू होत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या