JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur News : अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात विनयभंग; CCTV मुळे समोर आलं नराधमाचं दुष्कृत्य

Solapur News : अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात विनयभंग; CCTV मुळे समोर आलं नराधमाचं दुष्कृत्य

सकाळी 7 च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 19 जून : सोलापुरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची धक्कादायक घटना CCTV च्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर उभा राहिला आहे. सोलापुरातील मुख्य भागात तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. एका नराधमाकडून भर रस्त्यात अल्पवयीन मुलीला रस्त्याच्या कडेला नेत केला विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विनयभंगाची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अनोळखी व्यक्ती भर रस्त्यावर पीडितेला जवळ ओढून घेत असल्याचं दिसून येत आहे. तरुणीने चलाखीने स्वत:ची सुटका करून घेतली. ही घटना सकाळी 7 च्या सुमारास घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान काल राजगड पायथा गुंजवणे येथे राजगड घेरा व गुंजवणे गावाच्या हद्दीवर (सतीचा माळ) येथे एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. आईने चुकून मुलीला पाण्याऐवजी स्पिरीट दिलं; काहीच मिनिटात मृत्यू, नेमकं काय घडलं? स्थानिक माहितीच्या आधारे तिच्या कुटुंबातील लोकांशी संपर्क करून तिची ओळख पटविण्यात यश मिळवले. दर्शना दत्तू पवार (वय 26, मूळ राहणार सहजानंद नगर ता. कोपरगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. संबंधित तरुणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचीही माहिती मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या