चेन्नई 17 जून : एका छोट्या चुकीमुळे 9 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या मदुराई सरकारी रुग्णालयात एक भयानक घटना घडली आहे. या घटनेत आईने पाण्याऐवजी 9 वर्षांच्या मुलीला चुकून स्पिरीट दिलं होतं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे. ती किडनीच्या आजाराने त्रस्त होती. मात्र, तिचा मृत्यू स्पिरीटमुळे झाला नसल्याचे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे. Yavatmal News : 5 दिवसांच्या बाळाला दिले बिब्याचे चटके, अघोरी प्रकारानं महाराष्ट्र हादरला किडनीच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या 9 वर्षीय अगल्याला मदुराई सरकारी रुग्णालयात डायलिसिससाठी दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान आईने चुकून मुलीला पाण्याऐवजी स्पिरीट दिलं. यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला. अगल्याच्या आईने दावा केला की, परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे तिने आपल्या मुलीच्या बेडजवळ ठेवलेलं स्पिरीट पाणी समजून तिला पिण्यासाठी दिलं. तहान लागल्याने अगल्याने पाणी मागितलं असता आईने चुकून स्पिरीट दिलं. मात्र, चवीतील फरक लक्षात आल्याने मुलीने लगेच ते थुंकलं. या घटनेनंतर काही वेळाने अगल्याची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. मात्र, पोस्टमॉर्टममध्ये अगल्याचा मृत्यू ‘ब्रेन हॅमरेज’मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णालयाच्या वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्टने पुढे सांगितलं की “तिच्या तोंडात स्पिरीट प्यायल्याचा कोणताही पुरावा नव्हता, कारण ते फारच कमी प्रमाणात सेवन केलं गेलं होतं.” मदुराई सरकारी रुग्णालयाच्या डीनने सांगितलं की मुलीने खूप कमी प्रमाणात स्पिरीट घेतलं होतं, जे तिने लगेच थुंकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.