JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur News: दहावी नापास झाला आहात? नो टेन्शन! इथं प्रवेश आहे सुरू, असं आहे वेळापत्रक

Solapur News: दहावी नापास झाला आहात? नो टेन्शन! इथं प्रवेश आहे सुरू, असं आहे वेळापत्रक

Solapur

जाहिरात

दहावी नापास झाला आहात? नो टेन्शन! इथं प्रवेश आहे सुरू, असं आहे वेळापत्रक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 10 जून : सध्या महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने कौशल्य विकास आधारावर अनेक नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कमी वेळात आपले कौशल्य विकसित करून आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसावी, असा सर्वसामान्या वर्गातील तरुणांचा उद्देश असतो. त्यासाठीच ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कोर्सकडे वळतात. या कोर्सेसच्या माध्यमातून आपले भविष्य घडवू इच्छितात. अशा विद्यार्थ्यांसाठी यंदाची आयटीआय प्रवेश प्रक्रियेला सुरू झाली असून त्याचे वेळापत्रकही आले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही घेता येणार प्रवेश तुम्ही दहावी पास असाल किंवा नापास असाल तरी तुम्हाला आयटीआयला प्रवेश घेता येईल. 12 जून पासून म्हणजेच सोमवारपासून या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. तर पहिली गुणवत्ता यादी ही 20 जुलैला जाहीर होणार आहे. सर्वसाधारणपणे प्रवेशासाठी येणारा उमेदवार हा 14 वर्षावरील असावा शिवाय त्याने दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे.विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.

आयटीआय’ प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाइन अर्जाची सुरवात : 12 जून ते 11 जुलै पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : 19 जून ते 12 जुलै अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 16 जुलै पहिली प्रवेश फेरी 20 जुलै : द्वितीय प्रवेश फेरी : 31 जुलै दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : 1 ते 4 ऑगस्ट तिसरी प्रवेश फेरी : 9 ऑगस्ट चौथी प्रवेश फेरी : 20 ऑगस्ट पुणेकर कधीच हार मानत नाही! वयाच्या 59 व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा VIDEO फिटर, इलेक्ट्रिशनला सर्वाधिक पसंती ‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण 82 प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मशीन आणि वेल्डिंग या कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे 100 टक्के प्रवेश हाऊसफुल होतात. तरी सदरच्या संपूर्ण तारखा व्यवस्थितपणे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी तात्काळ आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करावी, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथील शिक्षकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या