अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 6 जून : आपल्या देशाच्या इतिहासात 6 जून या तारखेला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी 1674 साली (6 जून 1674) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. परकीयांचं आव्हान परतवून लावत शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मिती केली. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडासह संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिवशी राज्याभिषेक सोहळा पार पडतो. सोलापूरमध्ये देखील या निमित्तानं एक खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. ‘त्या’ साक्षीनं राज्याभिषेक सोलापूरमधील उद्योगपती किशोर चंडक यांच्या घरी शिवराज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. 1674 साली झालेल्या राज्याभिषेकाच्या मुख्य कार्यक्रमात सुवर्ण होनाची विशेष निर्मिती करण्यात आली होती. यामधील एक नाणे इथं ठेवण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी स्वत:च्या नावानं हे नाणं तयार केलं होतं. ही नाणं मोजक्याच मंडळींकडं आहेत. त्यामध्ये सोलापूरच्या किशोर चांडक यांचा समावेश आहे.
राज्याभिषेकाचा हा खास कार्यक्रम पाहण्यासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती. ‘शिवाजी महाराज की जय’ या जयघोषात हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराजांवरील वेगवेगळे श्लोक देखील सादर करण्यात आले. त्याचबरोबर दोन्ही ध्रुव, आंटार्टिका, सीना नदी, द्वारकादीश मंदिर विहीर आणि भीमा नदी या पाच ठिकाणांहून आणलेलं पाणी वापरण्यात आलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उलगडला शिवाजी महाराजांचा इतिहास, नागपूरकर भारावले Video ‘शिवाजी महाराजांच्या विजयाचं प्रतीक असलेलं हे नाणं आहे. हे नाणं परकीयांसाठी मोठा संदेश होते. शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा या नाण्यांना स्पर्श झाला. ही नाणी आम्ही जीवापाड जपतो, अशी भावना किशोर चंडक यांनी यावेळी व्यक्त केली. ‘साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महारांजांनी तयार केलेल्या या नाण्याच्या मार्फत हा राज्याभिषेक सोहळा झाला. त्याच नाण्यांनी हा कार्यक्रम झाला आहे. शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करत असताना आपण त्यांनी केलेला त्याग विसरता कामा नये,’ असं इतिहास अभ्यासक न. भा. काकडे यांनी स्पष्ट केलं.