JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मविआ'मधील आमदार फुटीच्या दाव्यावर जयंत पाटलांची सावध भूमिका म्हणाले...

'मविआ'मधील आमदार फुटीच्या दाव्यावर जयंत पाटलांची सावध भूमिका म्हणाले...

येत्या 15 दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील दहा ते पंधरा आमदार फुटणार असून ते शिंदे, भाजप गटात सहभागी होतील असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 10 फेब्रुवारी :  माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या 15 दिवसांमध्ये  महाविकास आघाडीमधील दहा ते पंधरा आमदार फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे. 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?  येत्या पंधरा दिवसांमध्ये महाविकास आघाडीमधील दहा ते पंधरा आमदार शिंदे ,भाजप गटात सहभागी होणार असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते. दरम्यान यावेळी जयंत पाटील यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आहे.

काय आहे बच्चू कडू यांचा दावा?  येत्या 15 दिवसांमध्ये महाविकास आघाडीमधील 10-15 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. पक्ष कोणता ते सांगत नाही. ठाकरे गटात आमदार राहिले नाहीत, हे आमदार बाकीच्या पक्षातील आहेत. अधिवेशनापूर्वी हे आमदार शिंदे भाजप गटात प्रवेश करतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही याचं मुख्य कारण म्हणजे कोर्ट आणि पक्षप्रवेश असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या