JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur News : वारीला जाऊया लालपरीने, इतक्या गाड्या आहेत सज्ज, संपूर्ण वेळापत्रक VIDEO

Solapur News : वारीला जाऊया लालपरीने, इतक्या गाड्या आहेत सज्ज, संपूर्ण वेळापत्रक VIDEO

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी भाविकांसाठी राज्य एसटी महामंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण वेळापत्रक पाहा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी  सोलापूर, 13 जून : आषाढी यात्रेचे औचित्य साधून दरवर्षी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी भाविकांसाठी राज्य एसटी महामंडळाकडून तयारी करण्यात आली आहे.  यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून जवळपास 5000 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोलापूर विभागातील नऊ डेपोतून जवळपास 250 पेक्षा अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.   जादा वाहतुकीचे नियोजन 

महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. यंदा देखील आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

 योजनांचा लाभ घ्यावा

एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी 25 जूनपासून एसटीच्या जादा फेऱ्या या पंढरपूर मार्गाने होणार आहेत. 3 जुलै पर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार आहे. शिवाय दरम्यानच्या काळात एसटी विभागाने अनेक योजना या भाविकांसाठी आणि महिलांसाठी आणल्या असून त्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, अशी माहिती सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव यांनी दिली आहे.

या ठिकाणी असतील थांबे

संबंधित बातम्या

चंद्रभागा बस स्थानक : पुणे, पंढरपुर, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, सांगली, रत्नागिरी, सातारा. भिमा बस स्थानक : सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ. विठ्ठल बस स्थानक : करमाळा, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक. पांडुरंग बसस्थानक : सांगोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली.

Pune News : महिला वारकऱ्यांची इथं खास व्यवस्था, पुण्यात 40 ठिकाणी विशेष कक्षाची स्थापना, Video

महिला, ज्येष्ठ नागरिकांची एसटीला पसंती

आषाढी वारीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. पण रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट दरातील सुविधा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरातून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये 50 टक्के सरसकट सवलत देऊ केली आहे. तसेच 75 वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच 65 वर्षांपुढील नागरिकांना अर्धे तिकीट आकारले जाते. यामुळे वारीतील ज्येष्ठ नागरिक एसटीला प्रथम पसंती देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या