अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 27 फेब्रुवारी : राज्यात रब्बी ज्वारीचे पीक हे हलकी, मध्यम, भारी आणि बागायत क्षेत्राखाली घेतले जाते. रब्बी ज्वारीचे वेगवेगळे उप-पदार्थ त्यात हुरडा, लाह्या, पापड, पोहे इ. तयार केले जातात. रब्बी ज्वारीचे जमिनीनुसार व प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी विविध वाणांचे संशोधन करण्यात आले आहे. सोलापूरसह राज्यात कोणकोणत्या प्रकारच्या ज्वारीची लागवड केली जाते ते पाहूया हलकी जमीन ज्या जमिनीची खोली 30 सेंमी पेक्षा कमी आहे तिला हलकी जमीन म्हणतात. हलक्या जमिनीत रेतीचे प्रमाण 60 ते 90 इतके असते. हलक्या जमिनीची जलधारण क्षमता व सुपीकताही कमी असते. या जमिनीखाली २३ टक्के इतके क्षेत्र आहे. या हलक्या जमिनीकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले अनुराधा व फुले यशोमती या वाणांची शिफारस केलेली आहे. मध्यम जमीन ज्या जमिनीची खोली 45-60 सेंमी असते तिला मध्यम जमीन म्हणतात. मध्यम जमिनीत रेतीचे प्रमाण 40-60 टक्के इतके असते. जलधारण क्षमता आणि सुपीकता या जमिनीमध्ये मध्यम दर्जाची असते. या प्रकारची जमीन राज्यात 48% इतकी आहे. मध्यम जमिनीकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मालदांडी 35-1, फुले चित्रा, फुले सुचित्रा या वाणांची शिफारस केलेली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने परभणी सुपर मोती, तर डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला विद्यापीठाने परभणी पी. के. व्ही. क्रांती या वाणांची शिफारस केलेली आहे. वर्ध्यात बहरली ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती, शेतकरी घेतोय लाखोंचे उत्पन्न, Video भारी जमीन भारी जमिनीत रेतीचे प्रमाण 10-40 टक्के असते. या जमिनीची जलधारण क्षमता आणि सुपीकता उत्तम असते. मध्यम पक्व होणारे वाण या जमिनीस चांगले प्रतिसाद देतात. म्हणून ज्वारी सुधार प्रकल्प राहुरीने फुले यशोदा (1998), फुले वसुधा (2007) आणि फुले रेवती (2010) राज्यस्तरावर आणि सी. एस. व्ही. 22 (2007) साली राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केल्या आहेत. ज्वारीच्या वाणाचे प्रकार फुले अनुराधा हे वाण 105-110 दिवसांत पक्व होतो. या वाणापासून 8-10 क्विंटल धान्याचे तर 30-35 किं./हे. कडब्याचे उत्पादन मिळते. ही जात खोडमाशीस अत्यंत प्रतिकारक आहे. खडखड्या रोगाची प्रतिकारक्षमता या जातीमध्ये अधिक आहे. कडब्याची प्रत आणि पाचकता ही जास्त आहे. ज्वारीची भाकरी ही चवदार आणि गोड आहे. फुले यशोमती या वाणापासून 9-11 किंटल धान्याचे तर 40-45 क्विं./हे. कडब्याचे उत्पादन मिळते. हा वाण 110-115 दिवसांत तयार होतो. या वाणापासून प्रचलित जाती फुले अनुराधा यापेक्षा हलक्या जमिनीत 10-15 टक्क्यांनी धान्याची तर २०-२५ टक्क्यांनी कडब्याची उत्पादन क्षमता अधिक आहे. ही जात खोडमाशीस अत्यंत प्रतिकारक आहे. खडखड्या रोगाची प्रतिकारक्षमता या जातीमध्ये अधिक आहे. ज्वारीची भाकरी ही चवदार E गोड आहे.
फुले चित्रा फुले चित्रा ही जात एस. पी. व्ही. ६५५ आणि आर. एस. एल. जी. ११२ यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीला ११८-१२० दिवस तयार होण्यासाठी लागतात. यापासून २०-२५ क्विंटल धान्याचे, तर ५५-६० क्विंटल प्रति हेक्टरी कडब्याचे उत्पादन मिळते. कडब्याची आणि भाकरीची प्रत ही मालदांडी प्रमाणेच चांगली आहे. परभणी सुपर मोती या वाणाची अवर्षणप्रवण भागात मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस केलेली आहे. या जातीस पक्व होण्यास 118 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र असतात. भाकरीची व कडब्याची प्रत चांगली आहे. या वाणाचे कोरडवाहूमध्ये सरासरी धान्य उत्पादन 30 ते 32 क्विंटल, तर कडबा उत्पादन 80 ते 90 क्विंटल मिळते. हे वाण अवर्षणास, खडखड्या, पानांवरील रोगास, खोडमाशी व खोडकिडीस मध्यम प्रतिकारक्षम आहे. दाणे मोत्यासारखे शुभ्र व ठोकळ आहेत. भाकरीची व कडब्याची प्रत चांगली आहे. या वाणाचे कोरडवाहूमध्ये सरासरी धान्य उत्पादन २५ ते ३० क्विंटल, तर कडबा उत्पादन 70 ते 80 क्विंटल मिळते. हा वाण अवर्षणास खडखड्या, पानांवरील रोगास प्रतिकारक्षम आहे. तब्येत ठणठणीत ठेवणारी तिरंगा थाळी! बीडमध्ये झाली चांगलीच फेमस, Photos फुले यशोदा फुले यशोदा हे वाण स्थानिक वाणांच्या संग्रहातून विकसित केले आहे. हे वाण भारी जमिनीसाठी कोरडवाहूकरिता शिफारित केला आहे. या वाणांस १२०- १२५ दिवस तयार होण्यासाठी लागतात. फुले मधुर (आर.एस.एस. जी. व्ही. 46) निघण्याचे प्रमाण, उत्कृष्ट प्रतीचा व चवदार हुरडा तसेच खोडमाशी कीड, खडखड्या रोग, करपा, पानावरील ठिपके आणि अवर्षणास प्रतिकारक आहे. या वाणाचा हुरडा हा 90-95 दिवसांमध्ये काढणीला येतो. यापासून 24-28 क्विंटल इतके हुरड्याचे प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. कडब्याचे उत्पादनसुद्धा या वाणापासून 55-60 क्विंटल इतके मिळते. या वाणाची खास हुरड्याकरिता फुले उत्तरऐवजी, पश्चिम महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात कोरडवाहूखाली प्रसारित करण्यात आली आहेत.
फुले पंचमी (आर. पी. ओ. एस. व्ही ३) फुले पंचमी (आर. पी. ओ. एस. व्ही ३) रब्बी ज्वारीच्या लाह्या शहरवासीयांमध्ये लो कॅलरी हाय फायबर स्नॅक फूड म्हणून लोकप्रिय होत आहेत. गुणवत्तेच्या दृष्टीने ज्वारीच्या लाह्या कुरकुरीत मोठ्या आकाराच्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भरपूर फुललेल्या असाव्यात. चवीला सहज विरघळणाऱ्या, मऊसर, चवदार असाव्यात. काही लोकांना मसालेदार लाह्या पण आवडतात. ज्वारीच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अडीच हजार क्विंटल बियाणांचे वाटप केले आहे. दहा लाख रुपयांवर पस्तीस टक्के अनुदान सुद्धा या सप्टेंबर महिन्याच्या लागवडीसाठी जाहीर केले होते. यंदाच्या वर्षी ज्वारीचे महत्त्व हे सर्वसामान्यांना अधिक कळल्याने त्याचे मूल्यवर्धन झाले पाहिजे या हेतूने शेतकऱ्यांना कशाप्रकारे वाढीव भाव मिळू शकतो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.