JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur News : मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकचा स्फोट, एका रुग्णासह नातेवाईकाचा मृत्यू

Solapur News : मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकचा स्फोट, एका रुग्णासह नातेवाईकाचा मृत्यू

या दोघांच्या मृत्यू ऑक्सिजन टॅंकचा स्फोटामुळे झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 25 मार्च : सोलापुरातील (Solapur) मार्कंडेय सहकारी रुग्णालयात (Markandeya Cooperative Hospital solapur) ऑक्सिजन टॅंकचा स्फोट (Oxygen tank blast) झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एक रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाचा समावेश आहे. सोलापुरातील पूर्व भागात गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मार्कंडेय रुग्णालयात ही घटना घडली. या रुग्णालयात दोन ऑक्सिजन टॅंक आहेत. त्यामध्ये एक नवीन तर दुसरा जुना टॅंक आहे. यातील जुन्या ऑक्सिजन टॅंकमध्ये स्फोट झाला होता. केमिकल रिॲक्शनमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र, स्फोटामुळे ऑक्सिजन टॅंकमधील पावडर (केमिकल) बाहेर पडले आणि रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या स्फोटानंतर मात्र कोविड सेंटरसह जनरल वॉर्डमधील रुग्ण जीवाच्या आकांताने बाहेर पळत सुटले. त्यानंतर अग्निशन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. उन्हाळ्यात भरपूर खा भेंडी, वजन कमी होण्यासोबतच होतात विविध फायदे.. तसंच महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि उपायुक्त धनराज पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नवीन टाकीद्वारे ऑक्सिजन सप्लाय सुरू होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.  दरम्यान, या दुर्घटनेत  रुग्णाचे नातेवाईक असलेल्या हनुमंत क्षीरसागर आणि पोस्ट कोविड असलेले सुनील लुंगारे यांचा मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यू ऑक्सिजन टॅंकचा स्फोटामुळे झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र मार्कंडेय रुग्णालय प्रशासनाने मात्र नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मृत रुग्णाची परिस्थिती ही आधीच खालावलेली असल्याचा दावाही रुग्णालय प्रशासनाने केला आहे. 12 वर्ष लहान तरुणीवर प्रकाश राज यांचं होतं प्रेम; मुलांनी केला होता लग्नाला विरो मृत हनुमंत क्षीरसागर यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करणार असल्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या