आपण भेंडीची भाजी खूपच आवडते. मात्र याच भेंडीचे अनेक आरोग्यदाई फायदेसुद्धा आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आम्ही तुम्हाला भेंडीच्या अशाच गुणधर्माबद्दल सांगणार आहे.
उन्हाळ्यात बाजारात भेंडी मोठ्याप्रमाणावर उपलब्ध असते. अनेक लोक भरलेली भेंडी करून भातासोबत खाण पसंत करतात. मात्र भेंडीचे अनेक आरोग्यदाई फायदे सुद्धा आहेत.
भेंडीमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी नाहीशा होतात. आणि त्वचा तरुण दिसू लागते. त्याचबरोबर भेंडीमध्ये विटामिन ए सुद्धा असतं. त्यामुळे त्वचेवर एक प्रकारची चमक येते.
दिवसभर कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांसाठी भेंडी खुपच उपयुक्त आहे. भेंडी मध्ये बीटा कॅरेटीन मोठ्या प्रमाणत असतं. त्यामुळं डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. तसचं डोळ्यांच्या विविध समस्येपासूनही आराम मिळतं.
समावेश करायला हवा. भेंडी मध्ये चांगले कार्ब्स मोठ्या प्रमणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहतं. त्याचबरोबर भेंडीमध्ये ओबेसिटी गुणधर्म असतं. त्यामुळे आपलं कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात बरेच लोक पोटांच्या समस्येने त्रस्त असतात. मात्र भेंडीचं सेवन केल्याने या त्रासापासून आराम मिळत. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यानं अपचन सारख्या समस्या दुर होत्तात.
उन्हाळ्यात भेंडीचं सेवन केल्यानं रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे विविध आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.