JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shiv Sena Dapoli : दापोली : शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून वाद, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Shiv Sena Dapoli : दापोली : शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून वाद, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळताच शिंदे गट आणि ठाकरे गट दापोलीत आमनेसामने आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिवाजी गोरे, (दापोली) : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळताच शिंदे गट आणि ठाकरे गट दापोलीत आमनेसामने आला. या दोन गटाच शिवसेना शहर शाखा ताब्यात घेण्यावरून जोरदार राजकीय राडा झाल्याची घटना काल (दि.17) शुक्रवारी रात्री घडली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दापोली शहरातील मूळ शिवसेना शाखा कोणाची यावरून वाद सुरू होता. मात्र, निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागताच आमदार योगेश कदम समर्थकांनी जोरदार घोषणा बाजी करत, उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की  करत  शिवसेना शाखा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले, यामध्ये जोरदार राडा झाला, परंतु पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

हे ही वाचा :  Shivsena : शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदेंची पुढची स्ट्रॅटेजीही ठरली! येत्या काही दिवसातच…

संबंधित बातम्या

राजकीय राड्या च्या दुसऱ्या दिवशीही तणाव मात्र काय आहे. दापोलीत पुन्हा राजकीय धुमश्चक्री  होण्याची शक्यता असून, पोलिसांनी कडे कोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे दापोलीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

धनुष्यबाणासह शिवसेना हे नावही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शिंदे-ठाकरे गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. दापोली येथे आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.  

जाहिरात

हे ही वाचा :  Shivsena : निवडणूक आयोगात शिंदेंच्या बाजूने निकाल कसा लागला? दोन मुद्द्यांनी बाजी पलटली, Inside Story

निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर दापोलीत तणावाचे वातावरण तयार झाले आहे. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट आणि समर्थकांनी ताब्यात घेतली. शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे, असे म्हणत शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राडा केला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या