JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवारांची उडी? शरद पवार मुंबईत येणार

Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवारांची उडी? शरद पवार मुंबईत येणार

भाजपला (bjp) सत्तेापासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (shivsena, congress, ncp) एकत्र एक सत्ता स्थापन केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 21 जून : मागच्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) सत्ता स्थापन झाली. भाजपला (bjp) सत्तेापासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (shivsena, congress, ncp) एकत्र एक सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीला एकत्र करण्याचे काम खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी केले होते. दरम्यान शिवसेनेच्या एकनाथ खडसे (shivsena eknath khadase) यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्ष खडबडून जागे झाले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या दिल्लीत आहेत ते या नाराजी नाट्यावर दिल्लीतून लगेच निघणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू आहे. ती झाल्यानंतर संध्याकाळच्या दरम्यान तीन्ही पक्षांची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार सध्यांकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यापूर्वी सत्ता स्थापनेवेळी अजीत पवारांनी हे बंड पुकारले होते यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा सरकारवर अशी स्थिती ओढावली आहे.

हे ही वाचा :  Congress mla Maharashtra : आता काँग्रेसचे 10 आमदार बाहेर पडणार? विजय वडेट्टीवार यांच्या मनात आहे तरी काय?

संबंधित बातम्या

सत्ता स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षातील काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान ही खदखद काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काही तासात राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार बंडाच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता मोठ्या तयारीला लागले आहेत. भाजपही आता सरकार स्थापनेसाठी कसून प्रयत्न करत आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  BREAKING : मनधरणी करण्यासाठी पोहोचला उद्धव ठाकरेंचा खास माणूस, पण शिंदेंनी दिला निरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार आपल्या 10 आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठेपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल का यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात

हे आहेत नॉट रिचेबल आमदार

एकनाथ शिंदे – कोपरी, अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद, शंभूराज देसाई – पाटण, सातारा, संदीपान भुमरे – पैठण, औरंगाबाद, उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद, भरत गोगावले – महाड, रायगड, नितीन देशमुख – बाळापूर, अकोला, अनिल बाबर – खानापूर,आटपाडी सांगली, विश्वनाथ भोईर – कल्याण(प), संजय गायकवाड - बुलढाणा, संजय रामुलकर - मेहकर, महेश शिंदे – कोरेगाव, सातारा, शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर, प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर, संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ, ज्ञानराज चौघुले – उमरगा, उस्मानाबाद, तानाजी सावंत – पारंडा, उस्मानाबाद, संजय शिरसाट – औरंगाबाद(प), रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद, सुहास कांदे, नांदगाव, नाशिक, बालाजी कल्याणकर , नांदेड उत्तर, शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण, महेंद्र दळवी, अलिबाग, महेंद्र थोरवे, कर्जत हे आमदारा नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या