Mumbai: NCP chief Sharad Pawar with MNS President Raj Thackeray during the opening ceremony of 98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan in Mulund, Mumbai on Wednesday night, June 13, 2018. (PTI Photo)(PTI6_14_2018_000038B)
प्रशांत बाग,नाशिक 16 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसाठी उघडपणे मैदानात उतरलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अजुनही संभ्रम आहे. विधानसभा निवडणुका मनसे लढणार नाही अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. निवडणुकांवर बहिष्कार घाला ही राज ठाकरेंची भूमिका आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मनसेला आघाडीत जागा नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मनसेला स्वबळावर निवडणुक लढवणं किंवा निवडणुकांवर बहिष्कार घालणं असे दोनच पर्याय शिल्लक आहेत. त्यामुळे मनसे निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पत्नीच्या साडीने गळफास घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पतीने संपवले जीवन EVM च्या मुद्यावरून राज ठाकरे यांनी देशभरात विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. कोलकात्यात जाऊन ते ममता बॅनर्जी यांनाही भेटले होते. समाधान होत नसेल तर निवडणुकीवर सर्वांनी बहिष्कार घालावी अशी राज ठाकरेंची भूमिका होती मात्र ती कुठल्याही पक्षाने मान्य केली नाही. राजकीय पक्षाला निवडणुकीवर बहिष्कार घालणं परवडणारं नाही असंही शरद पवार म्हणाले. मनसेचं मात्र निवडणूक लढवायची की नाही, हे अजून ठरलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे निवडणूक लढण्यासंदर्भात उत्साही नसल्यामुळे आणि निर्णयही होत नसल्याने पदाधिकारी अस्वस्थ आहेत. जो काही निर्णय असेल तो पक्षाच्या हिताचाच असेल अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. राजू शेट्टींचा गनिमी कावा: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर फेकल्या कडकनाथ कोंबड्या पवारांनी केला भुजबळांवर खुलासा राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरलेत. राज्यभर फिरून कार्यकर्ते आणि नेत्यांशी ते संवाद साधत आहेत. याच मोहिमेवर पवार आज नाशिकमध्ये होते. नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला. पवारांच्या प्रत्येक दौऱ्यात भुजबळ हे कायम त्यांच्यासोबत सावलीसारखे असायचे. मात्र आज भुजबळ दिसत नसल्याने त्यांच्या दौऱ्यात कायम तोच विषय चर्चेचा ठरला होता. भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जोरात आहेत. त्यातच पवार नाशिकमध्ये येणार असल्याने ते दौऱ्यात असणं अपेक्षीतच होतं. त्यामुळे पवारांनाही भुजबळ का नाहीत असा प्रश्न विचारण्यात येत होता. शेवटी पवारांनीच त्यांचा खुलासा केला पण चर्चा व्हायची ती काही थांबली नाही.
पवार म्हणाले, माझ्या दौऱ्याची आखणी ही भुजबळांनीच केली होती. मात्र जागावाटपाची काँग्रेससोबत बोलणी सुरू असल्याने त्याची बैठक मुंबईत आहे. त्या बैठकीसाठी छगन भुजबळ मुंबईत थांबले आहेत. भुजबळांशी त्याबाबत चर्चा झाल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार, जयंत पाटील आणि भुजबळ हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करत असल्याचंही पवारांनी सांगितलं. भुजबळ नाशिकमध्ये का नाहीत याचा ते वारंवार खुलासा करत सर्व काही अलबेल आहे असं सांगत होते.