पत्नीच्या साडीने गळफास घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पतीने संपवले जीवन

पत्नीच्या साडीने गळफास घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पतीने संपवले जीवन

पोलिस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरून 12 ऑगस्ट रोजी सुरेंद्र यांचा एका पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Share this:

सागर सुरवसे,(प्रतिनिधी)

सोलापूर, 16 सप्टेंबर: पोलिस कॉन्स्टेबलने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय-30) असे मृत पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून माढा पोलिस स्टेशनमध्ये ते कार्यरत होते. पोलिस वसाहतीमध्ये रविवारी रात्री 9:30 वाजता सिलिंग फॅनला साडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुरेंद्र हे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातून माढा पोलिस स्टेशनमध्ये मे महिन्यात रुजू झाले होते. सुरेंद्र हे घरात एकटेच होते,. त्यांची पत्नी व दोन मुले वसाहती बाहेरील प्रागंणात बसले होते. दरम्यान सुरेंद्र यांनी हॉलमध्ये पत्नीच्या साडीने फॅनला गळफास घेतला. पोलिस कॉलनीत असलेल्या महिलांना सुरेंद्र हे पख्याला लटकत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी घटना त्यांच्या पत्नी आणि माढा पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सुरेंद्र यांचा पंचनामा केला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यानी घटनास्थळी भेट दिली. सुरेद्र यांच्या पश्चात 3 वर्षांची मुलगी, पाच वर्षीय मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.दरम्यान पोलिस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरून 12 ऑगस्ट रोजी सुरेंद्र यांचा एका पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आदिवासी महिलेवर बलात्कार करून केली हत्या..

भिवंडीत आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. महिला कामावरून घरी  जात असताना नराधनाने तिचे अपहरन करून जंगलात नेले. तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली.

या प्रकरणी गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांनी गणेशपुरी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले आहे.

VIDEO: भाजपची फसलेली ऑफर! पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला किस्सा

First published: September 16, 2019, 5:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading