सीमा हैदरचा मोठा दावा
नोएडा, 18 जुलै : सध्या सचिन मीणा आणि पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. सीमा सचिनला भेटण्यासाठी अवैध पद्धतीनं नेपाळ मार्गे भारतात आली. दरम्यान या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. सीमाने केलेल्या एका खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. सचिन हा मला भेटण्यासाठी पाकिस्तानला येणार होता, मात्र मीच त्याला पाकिस्तानमध्ये येण्यास मज्जाव केला असा दावा सीमा हैदरनं केला आहे. काय आहे नेमका दावा? सचिन मला भेटण्यासाठी पाकिस्तानला येणार होता, मात्र आपणच त्याला पाकिस्तानला येऊ नको असं सांगितलं. कारण त्याच्या हातावर ओमचं चिन्ह गोंदवलेलं होतं. जर सचिन तिथे पकडला गेला असता तर त्याच्यासोबत काय झालं असतं याची कल्पनाही करता येत नाही, असा दावा सीमाने केला आहे. दरम्यान सचिनने देखील सीमाच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. त्याने सीमाच्या दाव्याबाबत बोलताना सांगितलं की, मी पाकिस्तानला जाण्याची सर्व तयारी केली होती. पासपोर्टसाठी अर्ज देखील केला होता. एका वृत्तपत्राकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार पासपोर्ट संबंधित काही कागदपत्र हे सचिनच्या घरी आढळून आले आहेत.
Seema Haider Love Story : सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीमध्ये मोठा खुलासा, फक्त भाऊच नाही तर काकासुद्धा…तीन जुलैरोजी अटक दरम्यान भारतामध्ये अवैधपद्धतीनं राहात असल्याच्या आरोपाखाली सीमाला आणि तिला आश्रय दिला म्हणून सचिनला गौतमबुद्ध नगर पोलिसांनी तीन जुलै रोजी अटक केली होती. त्यांना न्यायालयानं सात जुलै रोजी जामीन मंजूर केला. मी सचिनवर खूप प्रेम करते, सचिन हेच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतातच राहील असं सीमाने म्हटलं आहे.