JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी घटनेनंतर मोठा निर्णय! रायगडमध्ये ट्रेकर्संना बंदी

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी घटनेनंतर मोठा निर्णय! रायगडमध्ये ट्रेकर्संना बंदी

Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी येथे दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही काहीजण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

जाहिरात

इर्शाळवाडी घटनेनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 22 जुलै : रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून काही मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. घटनेनंतर इर्शाळवाडीत अजूनही बचावकार्य सुरू आहे. अद्याप घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा असून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. समोर आलेल्या यादीनुसार आत्तापर्यंत या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने मोठी निर्णय घेतला आहे. रायगडमध्ये नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत. इर्शाळगडला जाणार असाल तर ही बातमी वाचा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील “इरसालगड ठाकुरवाडी व इरसालगड” या नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळांच्या ठिकाणी व त्याच्या परिसरात इरसालगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणुक केलेल्या इतर व्यक्ती/ सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार दिनांक 23 जुलै ते दिनांक 6 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक अहवाल रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील संशयाद्रीच्या कुशीत वसलेले शिरगाव. या गावाला चारही बाजूने उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढले आहे. गेल्या 4 वर्षांपासून या गावात सतत डोंगर खचून दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या गावात आठ वाड्या आहेत. त्यामध्ये शिंदेवाडी, आंबेवनवाडी, लिंगायतवाडी, गंगेवाडी, विलासनगर, धनगरवाडी, रोहिदासवाडी, बौद्धवाडी, या वाड्यांचा समावेश आहे. या आठही वाड्या दरडीच्या छायेखाली आहेत, 2021 साली सात ते आठ ठिकाणी या गावाच्या डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणावर डोंगर खचून दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, अनेक ठिकाणची शेती वाहून गेली आहे, अतिवृष्टीत अजूनही या ठिकाणी थोड्यापार प्रमाणात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असते. त्यामुळे पावसाळ्यात या गावात दरड कोसळण्याच्या भीतीने लोक अक्षरशः रात्र जागून काढतात. वाचा - मगरींच्या नदीत अख्खी रात्र झाडाच्या फांदीवर बसून काढली, थरकाप उडवणारा Video संपूर्ण कोकणात दरड कोसळण्याचा आणि जीवितहानी झाल्याच्या मोठ्या घटना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात घडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील पसरे-बौद्धवाडी आणि बिरमणी तर रायगड जिल्ह्यात तळिये आणि आता इर्शाळवाडी या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन जीवितहानी झाली आहे, याच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या एका तालुक्यात 28 गावांमधील 44 वाड्या दरड कोसळण्याच्या धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या सर्व गाव आणि वाड्यांना जिल्हा प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे, यामधील शिरगाव हे अख्खे गावच दरडप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केले गेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील पोसरे, बिरमणी, त्यानंतर रायगड जिल्ह्यातील तळिये आणि आत्ता इर्शाळवाडी या दुर्घटनेनंतर कोकणातल्या दरड प्रवण क्षेत्रातील गावांचा सर्वे तर सुरु झालायय मात्र. एका खेड तालुक्यात शिरगाव या एका गावासह 28 गावांमधील 44 वाड्या दरडप्रवण क्षेत्रात मोडत असतील तर त्यांचे पुनर्वसन नेमके कुठे आणि कसे होणार याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, सध्यातरी या दरड प्रवण क्षेत्र असलेल्या गावांना केवळ कागदी नोटिसा देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या जातायेत. मात्र, आपल्या गावातील घरदार, गुरे जनावरे, घेऊन नेमकं जायचं कुठे आणि खायचं काय असा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या