JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Satara Minor Girl Rape : अल्पवयीन मुलीची इन्स्टावर मैत्री, नंतर वारंवार बलात्कार, रुग्णालयात तपासणी केली अन्…, साताऱ्यातील घटना

Satara Minor Girl Rape : अल्पवयीन मुलीची इन्स्टावर मैत्री, नंतर वारंवार बलात्कार, रुग्णालयात तपासणी केली अन्…, साताऱ्यातील घटना

सोशल मिडीयाच्या आहारी जात धक्कादायक घटना घडत आहेत. दरम्यान सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 16 फेब्रुवारी : मागच्या काही काळापासून राज्यात सोशल मिडीयाच्या आहारी जात धक्कादायक घटना घडत आहेत. दरम्यान सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीची एका मुलासोबत मैत्री झाली. दरम्यान यांच्या मैत्रीचे नात्यात रुपांतर झाले कालांतराने त्या मुलाने सातवीतील मुलीवर 15 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत आहे. सप्टेंबर 2022 दरम्यान या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. अल्पवयीन मुलाने मुलीला गोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

हे ही वाचा :  साहिलच्या लग्नाचा फोटो समोर, घटनेनंतर फोनचा डेटा डिलीट, निक्कीच्या हत्येची Inside Story

संबंधित बातम्या

बाहेर फिरायला गेल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. पुढे मुलाच्या घरात कोणी नसल्याने त्याचा गैरफायदा घेवून त्याने अत्याचार केला. वेळोवेळी अत्याचार झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुलीला पोटदुखी होवू लागली.

अखेर पालकांनी मुलीला दवाखान्यात नेल्यानंतर ती 4 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली. या घटनेने पालक कोलमडून गेले. मुलीला बोलते केल्यानंतर तिने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावरुन मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली.

हे ही वाचा :  साताऱ्यात पैशाच्या हव्यासापोटी एक वर्षाची मुलगी ठेवणी गहाण; हायकोर्टाने फटकारलं

तक्रारीवरुन पोलिसांनी शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेतील पिडीत मुलीवर उपचार सुरु आहेत. संशयित मुलगा व मुलगी हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या