सातारा, 12 सप्टेंबर : पुणे-बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. साताऱ्यातील डी-मार्टसमोर हा अपघात झाला आहे. ट्रकला मागील बाजूनं येणाऱ्या ट्रॅव्हलनं जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त प्रवासी कर्नाटकातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेनं जात असताना गुरुवारी (12 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (वाचा : निवडणूक आयोगाची बैठक,‘या’ 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा होणार जाहीर?
(वाचा : प्रेमविवाह, तरीही दाम्पत्यात वाद.. पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्नहत्या) पुण्यात भीषण अपघात! मद्यधुंद ट्रक चालकानं 5 जणांना उडवलं, दुचाकी नेल्या फरफटत तर,मंगळवारीदेखील पुण्यात अशी भीषण दुर्घटना घडली होती. पुण्यातील पिरंगुट घाट उतारावर मंगळवारी (10 सप्टेंबर) भीषण रस्ते दुर्घटना घडली. एका भरधाव ट्रकनं रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (10 सप्टेंबर) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना आहे. पिरंगुट घाट उतारावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रस्त्यावरील दुचाकींना जोरदार धडक देऊन पाच जणांना उडवलं. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या ट्रक चालकानं दोन दुचाकींना अक्षरशः फरफटत नेल्याचीही माहिती समोर आली आहे. (वाचा : संतापजनक!मुल व्हावं म्हणून मित्राच्या 3 वर्षांच्या मुलीला 7व्या मजल्यावरून फेकलं ) या भीषण अपघातानंतर ट्रक चालक घाबरला आणि घटनास्थळावरून तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पण सतर्क वाहतूक पोलिसांनी या ट्रक चालकाला घोटावडे फाटा येथे पकडलं. ट्रकचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. SPECIAL REPORT : ‘समस्या दूर करा नाहीतर मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू’