पुणे, 11 सप्टेंबर: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एनडीए रोड परिसरात ही घटना समोर आली आहे. अरुण सुरेश वाबळे (वय-34, रा. कोंढवे-धावडे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अरुणची आई जिजा वाबळे (वय-52) यांनी उत्तमनगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पत्नी अर्चना वाबळे-डावरे हिच्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, अरुण व अर्चना यांचा प्रेमविवाह झाला होता. अरुण पेटिंगचे काम करत होता, तर अर्चना ही खासगी शिकवणी घेत होती. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, अरुण व अर्चना यांच्यात घरगुती कारणावरून कायम वाद होत होते. यातून अर्चना, तिचा भाऊ व बहीण हे अरुण यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तसेच, त्यांनी अरुण यांना शिवीगाळ करून मारहाणही केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून अरुण याने शनिवारी (7 सप्टेंबर) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. चौकशीनंतर पोलिसांनी याप्रकरणी पत्नी, तिचा भाऊ व बहिण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलींचे फोटो काढणाऱ्याला चोप..
पत्रकार असल्याचे सांगून व्हिडिओ आणि फोटो काढणाऱ्या ठगाला इचलकरंजी शहरात नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. सचिन मुळे असे भामट्याचे नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज (बुधवार) दुपारी दीड वाजता ही घटना घडली. आरोपी इचलकरंजी शाळांमध्ये मुलींची फोटो काढत होता. मुलीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी चोप दिला.
वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL