JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे सरकारच्या काळातली पहिली घटना, पगार न झाल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य

शिंदे सरकारच्या काळातली पहिली घटना, पगार न झाल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य

सांगली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. वेळेत पगार न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

जाहिरात

भिमराव सूर्यवंशी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 16 फेब्रुवारी, असिफ मुरसल : सांगली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. वेळेवर पगार न झल्यानं त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भीमराव सूर्यवंशी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. त्यांनी आज सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. न्यायालयाचा आदेश असूनही पगार वेळेत होत नसल्याने एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी तणावात आहेत. सूर्यवंशी देखील तणावात असावेत असा अंदाज आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेही वाचा :   कोपरखैरणेमधील ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं; सुरक्षारक्षकानेच महिलेला संपवलं येत्या 24 तासांत पगार होणार?  दरम्यान पगार वेळेत होत नसल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले असतानाच दुसरीकडे आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. येत्या 24 तासांमध्ये पगार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जवळपास 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. दर महिन्याच्या दहा तारखेला होणारा पगार अद्यापही झालेला नाही, त्यामुळे एसटी कर्मचारी तणावात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या