JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News : जयंत पाटलांशी संबंधित राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा; संचालकांचा मोठा दावा; म्हणाले...

Sangli News : जयंत पाटलांशी संबंधित राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा; संचालकांचा मोठा दावा; म्हणाले...

Sangli News : राज्यात 14 ठिकाणी ईडीने छापेमारी केलीये. यात राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचाही समावेश आहे.

जाहिरात

राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 24 जून : ईडीची कारवाई आणि राजारामबापू बँक यांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही. सांगलीमधील व्यापाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून त्या व्यापाऱ्यांची ज्या-ज्या बँकांमध्ये खाती आहेत. अशा सर्व बँकांमध्ये ईडीने जाऊन चौकशी केली आहे. इस्लामपूरच्या राजारामबापू बँकेत ते त्यासाठीच आले आहेत, अशी माहिती बँकेचे संचालक शामराव पाटील यांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? सांगली शहरांमध्ये राजवाडा चौकामध्ये काही व्यापाऱ्यांची खाते आहेत. त्या व्यापाऱ्यांच्या खात्याच्या संदर्भातगेल्या दहा वर्षांपूर्वी काही तक्रार झालेले होत्या. त्यावेळेला आयकर खात्याने त्यांची चौकशी केली होती. पण त्यानंतर काल अधिकारी राजारामबापू बँकेच्या राजवाडा शाखेमध्ये आले. तिथल्या काही व्यापाऱ्यांच्या खात्यांची व्यवहारांची सर्व माहिती त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्या पंधरा खात्यांचे व्यवहार आणि गेल्या 25 वर्षांचे व्यवहार काय आहेत याबाबत सगळी माहिती त्यांनी घेतली. तसेच त्यांची केवायसी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड जे काही ठेवायची आहे ती केवायसी त्यांनी विचारून घेतली. तसेच खाते नियमित आहेत का, नियमित नाही त्यांच्या खात्यावर काही व्यवहार झाले याची सगळी माहिती त्यांनी विचारली आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जी माहिती पाहिजे आहे ती माहिती त्यांना दिलेली आहे. वाचा - पंकजा मुंडेंसाठी दोन प्रमुख पक्षांची फिल्डिंग, थेट मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर! काही व्यापाऱ्यांची खाती 25 वर्षांपासून आहेत. तर काहींची पंधरा वर्षांपासून आहेत. काही 10 वर्षांपासूनही वापरत आहेत. ही सगळी खाती नियमित आहेत. पारेख बंधूंची काही खाती  वैयक्तिक आणि पारेख बंधूंच्या संबंधात आहेत. त्याची चौकशी ईडी करत आहे. बँकेमध्ये गेल्या 42 वर्षांमध्ये कधी काही झालेले नाही. व्यापाऱ्यांचे व्यवहार होत असतात आणि ते आम्हाला बँकेला माहिती असतातच असं नाही. व्यापारी पैसे बँकेत त्यांच्या खात्यात ठेवत असतात आणि काढत असतात. पण हवाला हा एक वेगळाच प्रकार आहे. तो प्रकार आमच्या बँकेमध्ये कधीही झालेला नाही. यापुढेही होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या