राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अश्रू अनावर
आसिफ मुरसळ, प्रतिनिधी सांगली, 6 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायची घोषणा केली. शरद पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. एवढच नाही तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तर व्यासपीठावरच अश्रू अनावर झाले. नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला, यानंतर राष्ट्रवादीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूरमध्ये होते, त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यालाही अश्रू अनावर झाले. जयंत पाटील यांची साखराळे मध्ये सभा पार पडली. यासभेसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिल पाटील यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. शरद पवारांबद्दल जयंत पाटील यांच्या हृदयात असलेल्या प्रेमाबद्दल अनिल पाटील या कार्यकर्त्याने पेढा भरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनिल पाटील यांना आपल्या नेत्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले.
जयंत पाटलांचा गौप्यस्फोट शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते. राष्ट्रवादीपासून शरद पवार बाजूला गेले असते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.