JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अनैतिक संबंधाने घेतला सहा वर्षाच्या चिमुकल्याचा बळी, आईसह प्रियकराला अटक

अनैतिक संबंधाने घेतला सहा वर्षाच्या चिमुकल्याचा बळी, आईसह प्रियकराला अटक

चिमुकल्याच्या अपहरणाचा बनाव रचत आईनेच त्याचा खून केल्याचं समोर आलं असून यामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.

जाहिरात

sangli crime news

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

असिफ मुरसल, सांगली, 09 मे : अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे हा प्रकार घडला. सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केला होता. एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी कसून तपास करून खरा प्रकार उघडकीस आणला आहे. निर्दयी मातेसह प्रियकर विटा पोलिसांच्या ताब्यात आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हीचे लग्न झाले असून शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा आहे. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी निर्दयपणे त्याचा काटा काढायचे ठरवले. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. तर इकडे रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते. 13 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केल अन्, सगळेच हादरले   दरम्यान, विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. दोघांची कसून चौकशी सुरू आहे, या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या