मुंबई, 18 ऑक्टोबर : शिवसेना पक्ष फोडल्यानंतर आता विरोधकांचं पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप पवार कुटुंबातील सदस्य आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांच्या या आरोपांवर आता खुद्द अजित पवार यांनाच स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असं बोलूच शकत नाही. तसं काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावं लागेल, त्याने नेमकं कशामुळे हे वक्तव्य केलं ते पाहावं लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो, असं अजित पवार म्हणाले. काय म्हणाले होते रोहित पवार? शिवसेनेनंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण काहीही झालं तरी आमच्यात फूट पडणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नाही, असं विधान रोहित पवार यांनी केलं होतं. पुण्यात शिंदे गट करणार धमाका; मनसे, राष्ट्रवादीचे अनेक नेते लागले गळाला? एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, तसंच राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. आपण बंड केलं नसल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरही दावा केला. एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनीही काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचं खळबळजनक विधान केलं होतं. शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरेंनंतर शिंदेंचं पुढचं टार्गेट पवार, ‘राष्ट्रवादी’चा पेपर आधीच फोडला!