JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ramesh Bais : रमेश बैस यांनी घेतली भगतसिंह कोश्यारींची जागा; कोण आहेत राज्याचे नवे राज्यपाल?

Ramesh Bais : रमेश बैस यांनी घेतली भगतसिंह कोश्यारींची जागा; कोण आहेत राज्याचे नवे राज्यपाल?

रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी 2019 मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान राज्यपालांवर विरोधकांनी टीकाही झाली होती. त्यांच्या जागी रमेश बैस यांची निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी 2019 मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. 1999 पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

संबंधित बातम्या

हे ही वाचा :  मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

रमेश बैस झारखंडचे 2001 पासून राज्यपाल आहेत. 2019 ते 2021 या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते. 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते. 1989 आणि 1996-2019 या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

बैस यांचा जन्म रायपूरचा. भारतीय जनता पक्षाचे नेते असलेल्या बैस यांचं शालेय शिक्षण भोपाळ इथे झालं. 1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. 1980 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.

जाहिरात

हे ही वाचा :  ठाण्यात राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. रायपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग 6 वेळा याच मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून येत गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण खात्याचीही धुरा सांभाळली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या