JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; पावसामुळे वाहतूक विस्कळीत, या गाड्यांना तब्बल 10 तासांपेक्षा अधिक विलंब!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; पावसामुळे वाहतूक विस्कळीत, या गाड्यांना तब्बल 10 तासांपेक्षा अधिक विलंब!

राज्यात सध्या पावसांची संततधार सुरू आहे. याचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

जाहिरात

पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 20 जुलै : राज्यात सध्या पावसांची संततधार सुरू आहे. याचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत,  तर काही रेल्वे गाड्या या उशिरानं धावत आहेत. अप-डाऊन मार्गावरील तब्बल 12 रेल्वे गाड्या या नियोजित वेळेपेक्षा उशिरानं धावल्या आहेत. यामध्ये आझाद हिंद एक्स्प्रेसला तर तब्बल 13 तास विलंब झाला आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पावसाने अप-डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. यात आझादहिंद एक्स्प्रेस 13 तास, अंत्योदय एक्स्प्रेस 5 तास, कामायनी एक्स्प्रेस 2 तास, गोरखपूर अंत्योदय 2 तास, पुणे -हटिया एक्स्प्रेस 3 तास, मंगला एक्स्प्रेस 4 तास, अप मार्गावरील गीतांजली एक्स्प्रेस साडेतीन तास, रत्नागिरी एक्स्प्रेस 4 तास, पवन एक्स्प्रेस 2 तास, दानापूर-पुणे एक्स्प्रेस दीड  तास, बांद्रा हमसफर एक्स्प्रेस 3 तास उशिराने धावत आहे. राज्यातील या भागांना रेड अलर्ट   दरम्यान आज राज्यातील लोणावळा, कर्जत, दापोली, महाबळेश्वर, महाड या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या