JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raigad weather alert : रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Raigad weather alert : रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

बुधवारी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात

अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 26 जुलै : खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस सुरू आहे. आठवडाभरापासून पाऊस काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. यामुळे कोकणात नद्या पात्र ओलांडून ओसंडून वाहात आहेत. तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातल्या या सततच्या पावसामुळे प्रशासन आणि यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. रात्रीपासून पावसाने नवी मुंबई आणि रायगडमध्ये जोर धरला आहे. आज रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

संबंधित बातम्या

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे.

काही मदत संपर्क नंबर प्रासरित करून मदत मागण्यासाठी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जिल्यातील सर्व शासकीय यंत्रणा दक्ष राहणार असून येणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या