इर्शाळवाडी
रायगड, 20 जुलै : इर्शाळवाडी म्हणजे निसर्गाची खाणच जणू आणि इर्शाळगडाला जाण्याआधी मधल्या पट्ट्यात ही ही इर्शाळवाडी लागते. ट्रेकिंगसाठी जाणारे लोक इथूनच जातात. हा मधला पट्टा मानला जातो. इर्शाळगडावर जाण्याआधी तुम्हाला या वाडीतूनच जावं लागतं असंही ट्रेकर्स सांगतात. इर्शाळवाडी जशी सात दिवसांपूर्वी होती त्यापेक्षा भयंकर चित्र आज आहे. अत्यंत विदारक आणि भयानक स्थिती आहे झाली आहे. इर्शाळवाडीत आता फक्त जिकडे तिकडे मातीचे ढिगारे आणि जमीनदोस्त झालेली घरं दिसत आहेत. बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर इर्शाळवाडीवर रात्री उशिरा दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही शोधमोहिम सुरू आहे. ३० ते ४० जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.
अगदी छोटं दिसणारं हे गाव इर्शाळगडाला जाताना मध्यात लागतं. अचानक बुधवारी रात्री दरड कोसळून दुर्घटना घडली आहे. 7 दिवसांपूर्वी इर्शाळगड आणि इर्शाळवाजी कशी दिसत होती तिथल्या ट्रेकिंगचा थरार युट्यूबर जीवन कदम याने आपल्या युट्यूबवर शेअर केला होता. तिथले काही थरारक क्षण त्याने ट्रेकिंग दरम्यान सांगितले होते.
आज मात्र तिथे फक्त माती आणि जमीनदोस्त झालेली घरं आहेत. लोकांच्या रडण्याचे आक्रोश आणि आपला माणूस कधी सापडतो याची डोळ्यात आस आहे. मुख्यमंत्र्यांपासून नेते आणि बचावकार्य करणारी टीम सगळ्यांनी धीर दिला, सहकार्य करत आहेत, मात्र इथल्या लोकांच्या काळजावरील दु:खं फार मोठं आहे.
याठिकाणी जाण्यासाठी माणवली या गावातून चालत जावं लागतं. तीव्र उतारावर वस्ती असल्यानं तिथं पोहोचणं कठीण आहे. ठाकर नावाचे आदिवासी समाजाचे लोक या वाडीत राहतात. दरड कोसळण्याची घटना ही बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. यात 25 ते 26 कुटुंब बाधित झाल्याची माहिती आहे. यातील 21 जखमी असून 17 लोकांवर बेस कँप येथे उपचार तर 4 लोकांवक एमजीएम येथे उपचार सुरू आहेत. या घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आगे. तर, इतर लोकांचा शोध घेतला जात आह़े.