जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रात्री झोपले अन् सकाळी अख्खं गावच गायब झालं; इर्शाळवाडीच्या घटनेनं माळीणच्या आठवणी ताज्या

रात्री झोपले अन् सकाळी अख्खं गावच गायब झालं; इर्शाळवाडीच्या घटनेनं माळीणच्या आठवणी ताज्या

रात्री झोपले अन् सकाळी अख्खं गावच गायब झालं; इर्शाळवाडीच्या घटनेनं माळीणच्या आठवणी ताज्या

इर्शाळवाडीच्या या घटनेनं पुन्हा एकदा माळीण आणि तळीये गावातील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 जुलै : दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली. या घटनेनं क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पन्नास ते साठ घरांची वस्ती असलेल्या या गावात घरांवर दरड कोसळली. या घटनेत 120 ते 130 लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यापैकी 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. इशार्ळवाडीच्या या घटनेनं पुन्हा एकदा माळीण आणि तळीये गावातील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. माळीणमध्ये नेमकं काय झालं होतं? 30 जुलै 2014 ची रात्र माळीण गावासाठी काळरात्र ठरली. आजही ही घटना आठवली की अंगावर काटा येतो. संपूर्ण डोंगरच माळीण गावावर कोसळला. क्षणात हे गाव गाडलं गेलं. या घटनेला नऊ वर्ष उलटून गेले आहेत. माळीण हे गाव अंबेगाव तालुक्यात येतं. जेव्हा गावावर डोंगर कोसळला तेव्हा या गावाची लोकसंख्या अंदाजे 750 च्या आसपास होती. ग्रामस्थ साखर झोपेत असताना डोंगर गावावर कोसळला. या घटनेत 44 हुन अधिक घरं ग्रामस्थ आणि पशूंसह गाडली गेली. या दुर्घटनेची भीषणता इतकी होती की, सहा दिवसांनंतर देखील मृतदेह बाहेर काढणं सुरूच होतं. तब्बल 151 लोकांनी या घटनेत आपला जीव गमावला. सकाळी एसटी घेऊन आलेल्या चालकामुळे या घटनेची माहिती मिळाली. मात्र मोबाईल आणि इतर साधणाची मदत न मिळाल्यानं मदत पोहोचेपर्यंत बराच उशिर झाला. Irshalwadi Landslide : रेस्क्यू ऑपरेशन करणंही कठीण, अशी आहे इर्शाळवाडीतील सध्याची भयानक परिस्थिती तळीयेची दुर्घटना तळीये गावात देखील अशीच दुर्घटना घडली होती. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळीये हे गाव आहे. 22 जुलै 2021 रोजी हा अपघात घडला. गावावर दरड कोसळली. या घटनेत 35 घरं जमीनदोस्त झाले. या घटनेत जे कामावर गेले होते तेवढेच जिवंत राहिले. ही घटना एवढी भीषण होती की चार दिवस मातीच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. जवळपास 53 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. चौथ्या दिवशी बाचाव कार्य थांबवण्यात आलं. जे 32 जण बेपत्ता होते त्यांना अखेर मृत घोषित करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात