JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '...तुमच्या गुरूंचा इतिहासच खंजिराचा', राऊतांवर निशाणा साधताना भाजपचं टार्गेट पवार!

'...तुमच्या गुरूंचा इतिहासच खंजिराचा', राऊतांवर निशाणा साधताना भाजपचं टार्गेट पवार!

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सरकार अस्थिर असल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांना जोरदार टोला लगावला आहे.

जाहिरात

संजय राऊत, चंद्रकांत पाटील

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 16 नोव्हेंबर :  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सरकार अस्थिर असल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांना जोरदार टोला लगावला आहे.  संजय राऊत ज्यांना गुरू मानतात त्या शरद पवारांचा इतिहासही खंजीराचाच आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचा इतिहास खंजीराचा असल्यामुळे इतरांच्या खंजीराला पार्श्वभूमीवर असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?  चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. सरकार अस्थिर आहे. सरकार फारकाळ टीकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.  संजय राऊत ज्यांना गुरू मानतात त्या पवारांचा इतिहास देखील खंजिराचा आहे. त्यामुळे इतरांच्या खंजीराला पार्श्वभूमी आहे. हिंदुत्व सोडल्यामुळे असाह्य झाल्यानं त्यांनी शिवसेना सोडली. तरीही त्यांचा तो अतंर्गत मामला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.  हेही वाचा:   महाविकासआघाडीची चर्चा का थांबली? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी सांगितली Inside Story ‘ते तर विरोधकांचं कामच’  सरकार अस्थिर होत चाललं आहे असं विरोधकांनी म्हणायचं असतं. ते त्यांचं कामच आहे. त्यामुळे कार्यकर्ते चार्ज होतात असंही पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी पुणे शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पुणे शहरात आता वाहतूक कोंडी राहिलेली नाही. वाहतूक कोंडी ही मीडियाने तयार केलेली आहे. महापालिकेचे काम जोरदार सुरू आहे. वाहतूक कोंडीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच सर्व ठिक होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. हेही वाचा:       एकनाथ खडसेंना आणखी एक धक्का, भाजप आमदाराचा मार्ग मोकळा बच्चू कडू यांचा टोला   दरम्यान दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी देखील मंगळवारी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. सरकार अस्थिर आहे असं म्हणावं लागतं. उरलेले आमदार वाचवण्यासाठी संजय राऊत तसं म्हणत आहेत, आम्हीही सरकार पडेल असं म्हणायचो असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या