JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काय सांगताsss विदेशी मद्य रिचवण्यात पुणेकर अव्वल, मुंबईकरांना दिला धोबीपछाड

काय सांगताsss विदेशी मद्य रिचवण्यात पुणेकर अव्वल, मुंबईकरांना दिला धोबीपछाड

म्हणतात ना, ‘पुणे तिथे काय उणे’. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर: म्हणतात ना, ‘पुणे तिथे काय उणे’. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कोराना संसर्गाचा काळ त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये याही वर्षी पुणेकरांनी विदेशी मद्य रिचवण्यात मुंबईकरांना धोबीपछाड दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुणेकर मुंबईकरांपेक्षा काही कमी नाहीत, हे याही वर्षी पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. एवढं नाही तर औरंगाबादकरांनी देखील इतकी मद्य रिचवली की, मद्यातून मिळणाऱ्या महसुलात त्यांनी चक्क मुंबईला मागे टाकलं आहे. हेही वाचा… पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, रात्रीच्या संचारबंदीत पोलिसांकडून अंशत: बदल तसं पाहिलं तर 2020 हे वर्ष ‘कोरोना वर्ष’ म्हणून ओळखलं जाणार आहे. यामुळे लागलेला लॉकडाऊन तो कसा कोणी विसरेल. 2020 या वर्षात सर्वच क्षेत्रांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे. पण मद्यनिर्माते आणि मद्यसेवन करणाऱ्यांवर कोरोना काहीच करु शकला नाही. मद्यपी हा या काळातील राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता, असंच म्हणावं लागेल. कारण कोरोनाच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था पूर्ण ठप्प झाली होती. लॉकडाऊनच्या काळात मद्यपींनी अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यात मोठं योगदान दिलं. राज्याच्या तिजोरीत भरभरुन पैशांचा पाऊस पडला, हे महत्त्वाचं. राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारीनुसार, आश्चर्य म्हणजे IPL 20-20 सारखी पुणे-मुंबईची देखील मद्यविक्री आणि सेवनाबाबत 20-20 ची मॅच सुरु होती. ज्यात बाजी मारली ती पुणेकरांनी. फक्त विदेशी मद्य पिण्यात पुणेकरांनी सर्वांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. 2020 या वर्षभरात नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुणेकरांनी 185.24 लाख लिटर विदेशी मद्य रिचवली. पुणेकरांमुळे विदेशी मद्य पिण्यात मुंबईकर मागे टाकलं आहे. मुंबईसह उपनगरीत लोक 170.05 लाख लिटर विदेशी प्यायले. तर पुणे-मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनी 144.71 लाख लिटर विदेशी मद्य सेवन केली. सर्वात कमी विदेशी विदेशी मद्य सिंधुदुर्गकरांनी प्यायलय ते म्हणजे फक्त 3.08 लाख लिटर. फक्त विदेशी मद्यच नाही तर बिअर आणि वाईन पिण्यातही पुणेकारांनी मुंबईसह सर्वांना मागे टाकलं आहे. - वर्षभरात पुणेकांरांनी 170.75 लाख लिटर बिअर फस्त केली. - 157.97 लाख लिटर बिअर उपनगरीय मुंबईकर प्यायलेत - 146.66 लाख लिटर बीअर उपनगरीय मुंबईकर प्यायलेत तर सर्वात कमी बिअर फक्त 3.78 लाख लिटर बिअर हिंगोलीकर प्यायलेत. - 7.59 लाख लिटर वाईन पुणेकर प्यायलेत - 7.20 लाख लिटर वाईन उपनगरीय मुंबईकर प्यायलेत - सर्वात कमी वाईन म्हणजे 0.05 लाख लिटर वाईन गोंदिया आणि हिंगोलीकर प्यायलेत. विशेष म्हणजे राज्याच्या उपराजधानीत सर्वात जास्त देशी मद्य प्यायली गेल्याची माहिती समोर आली आहे. 150.47 लाख लिटर देशी मद्य नागपूरकर प्यायले. 146.42 लाख लिटर देशी मद्य पुणेकर प्यायले 126.42 लाख लिटर देशी मद्य नाशिकरोड प्यायले फक्त 5.88 लाख लिटर देशी मद्य सिंधुदुर्गकर प्यायलेत. राज्याला काय फायदा? एवढं मद्य पिवून राज्याला फायदा झाला का? तर फक्त फायदा नाही चांगलाच फायदा राज्य सरकारचा झाला आहे. तो म्हणजे अपेक्षा नसताना ही राज्याला मद्य विक्रीतून तब्बल 7 हजार 776.66 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यावेळेस मात्र पुणेकर मागे राहिले असून औरंगाबादकरांचा राज्याच्या महसूलात हातभार लावण्यात सिंहाचा वाटा आहे. - मद्य विक्रीतून राज्याला 1 हजार 837.81 कोटी रुपये महसूल मिळवून दिला. - तर नाशिकरांनी मद्य विक्रीतून राज्याला 1 हजार 814.53 कोटी रुपये महसूल मिळवून दिला. - पुणेकरांनी मद्य विक्रीतून राज्याला 1 हजार 019.78 कोटी रुपये महसूल कांद्याला मिळवून दिला. - तर वाशिमकरांनी सर्वात कमी म्हणजे फक्त 1 कोटी 61 लाख रुपये मद्यविक्रीतून राज्याला म्हणून मिळवून दिला. हेही वाचा… ‘त्यांनी ED चौकशी लावली तर मी CD लावेन’, असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंचं मौन! 32 हजार 238 अवैध विक्रीचे गुन्हे दाखल कोरोनाच्या काळात अवैध मद्यविक्री जोरात सुरु होती. या काळात तब्बल 32 हजार 238 अवैध विक्रीचे गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक म्हणजे या कारवाईत 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. आणि 19 हजार 462 अवैध मद्यविक्री करणाऱ्यांना उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. अवैध मद्यविक्री करता वापरण्यात आलेल्या 2 हजार 663 गाड्या देखील उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या