रायचंद शिंदे पुणे, 9 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या थिगळे कुटुंबीयांच्या घरात तब्बल 55 वर्षानंतर मुलगी जन्माला आली. या चिमुकलीच्या जन्मामुळे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावाराच राहिलेला नाही. या चिमुकलीचं आणि तिच्या आईचं घरातल्या सदस्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केलं. राजगुरूनगरमधीर रहिवासी समीर आणि नीलिमा थिगळे यांच्या चेहऱ्यावर सध्या जरा विशेष आनंद दिसत होता. त्याचं कारणही तसेच आहे. तब्बल 55 वर्षानंतर थिगळे कुटुंबात एका छोट्या परीने जन्म घेतला आहे. या छोट्या परीला आणि आईला रविवारी (8 सप्टेंबर) वाजतगाजत घरी आणण्यात आलं. (वाचा : महालक्ष्मीचे रुप समजून सासूबाईंनी केली आपल्या दोन्ही सुनांची पूजा… )
घरचा उंबरठा ओलांडताना आई आणि लेकीचं स्वागत फुलांच्या पायघड्यांनी-रांगोळ्यांनी केलं गेलं. गावकरी, पाहुणे आणि उपस्थितांना पेढे, साखरेचं वाटप करत हा आनंदोत्सव थिगळे कुटुंबानं साजरा केला गेला. आई आणि बाळाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली गेली. कुटुंबातील महिलांनी फुगडी खेळत स्वागत केलं. या चिमुकलीचं शांभवी असे नाव ठेवण्यात आलं आहे. (वाचा : लग्नानंतर जोडप्यांनी या गोष्टींची काळजी घ्याच, आयुष्यभर राहील नात्यात प्रेम)
एकीकडे खेड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चार वेगवेगळ्या घटनांत नुकत्याच जन्मलेल्या मुली नकोशा झाल्यानं बेवारस अवस्थेत सोडल्याच्या घटना ताज्या असताना याच खेडमध्ये थिगळे कुटुंबीयांनी घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं थाटामाटात स्वागत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. (वाचा : जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आता महाराष्ट्रात, या हिलस्टेशनवर पडला तुफान पाऊस)
बोलता येत नाही, ऐकू येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना