महालक्ष्मीचे रुप समजून सासूबाईंनी केली आपल्या दोन्ही सुनांची पूजा...

आपल्या दोन्ही सुनांना देवी स्वरुपात विराजमान करून त्यांची पूजा केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 07:43 PM IST

महालक्ष्मीचे रुप समजून सासूबाईंनी केली आपल्या दोन्ही सुनांची पूजा...

किशोर गोमाशे,(प्रतिनिधी)

वाशीम, 8 सप्टेंबर: येथील ड्रीम लॅन्ड सिटी येथे राहणार्‍या श्रीमती सिंधुबाई सुभाष सोनुने यांनी अनोख्या पद्धतीने गौरीपूजन (महालक्ष्मी ) सोहळा साजरा केला. आपल्या दोन्ही सुनांना देवी स्वरुपात विराजमान करून त्यांची पूजा केली. सिंधुबाई यांनी सगुण जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचे पूजन करून समजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

सासू-सुनामधील जिव्हाळा कायम राहावा..

सिंधुबाई यांना दोन मुले आहेत. विशेष म्हणजे सिंधुबाई यांची एक सून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका तर दुसरी गृहिणी आहे. रेखा सचिन सोनुने आणि पल्लवी प्रमोद सोनुने अशी सिंधुबाईंच्या सूनांची नावे आहेत. सासू आणि सुनामधील सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, हा या मागील आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने यांनी सांगितले. दरम्यान, सिंधुबाई यांच्या घरातील गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

ठाण्यात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य..

Loading...

गणेशोत्सवाच्या काळातच गुरूवारपासून सर्व ठिकाणी घरोघरी गौराईचे आगमन झाले आहे. ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा येथे देखील दीडशे वर्षांपूर्वीच्या गौराई आहेत. शुक्रवारी कोळी कुटुंबियातील महिलांनी आपल्या गणरायाला गोड जेवणाचे नैवद्य तर गौराईला तिखट जेवणाचे म्हणजेच मांसाहार जेवणाचा नैवेद्य दाखवला. दाखवलेल्या नैवेद्यात खेकड्याच कालवण, मासे, निवटे, कोंबडीवडे, भाकरी, भात अशा अनेक मांसाहार खाद्यपदार्थांचा समावेश होता.

रविवारी लालबागच्या राजाला भक्तांची तुडूंब गर्दी, पाहा LIVE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...