JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या प्रगतीसोबत देवाने मांडला खेळ, आता घरही होणार जप्त!

आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या प्रगतीसोबत देवाने मांडला खेळ, आता घरही होणार जप्त!

कॅन्सर या आजाराचं नाव जरी काढलं तरी डोळ्यासमोर अंधार पसरतो, या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांचा संघर्ष आयुष्यभर सुरू असतो. अशाच एका रुग्णाची संघर्षमय कहाणी आपण वाचणार आहोत.

जाहिरात

प्रगती धामणकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 एप्रिल : प्रगती धामणकर ही तरुणी 2010 पासून आजपर्यंत कॅन्सरशी लढतेय. एकदा नाही तर पाठोपाठ पाच वेळा तिला कर्करोगाचं निदान झालं, वडिलांचं कर्करोगानं निधन झालं, आईचा किडनीच्या विकारानं जीव गेला, सख्खी बहीण आणि भावालाही दुर्धर आजारानं ग्रासलं आणि त्यांचाही मृत्यू झाला. आधार असलेलं कुटुंब आता फोटोफ्रेममध्ये कैद झालं. अशात राहत्या घराची जप्ती होणार असल्याची नोटीस बँकेनं प्रगतीला धाडली आहे. आजारांशी लढत आलेल्या प्रगतीसमोर एक नवं संकट उभं राहिलंय, प्रगतीच्या डोक्यावरील छत 4 दिवसात तिच्यापासून हिरावलं जाणार आहे.

प्रगतीच्या भावानं 2011 साली घर गहाण ठेवून कर्ज घेतलं, 2012 साली भावाचा मृत्यू झाला, कर्ज फेडण्याची मुदत 10 वर्षाची असतानाही आपले उपचार, काम यातून ते फेडता येईल इतकी रक्कम ती जमा करू शकली नाही. त्यामुळे बँकेकडून आता घर जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. या आजाराशी लढताना तिला आपल्या डोक्यावरचं छत राहील की नाही हा प्रश्न भेडसावतोय. कॅन्सरच्या विळख्यात अडकलेल्या प्रगतीकडे जगण्यासाठी काहीच वर्ष उरली आहेत, जितकं आयुष्य उरलंय ते आपल्याच घरात जगावं अशी ती इच्छा आहे. दोन वेळा स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर), अंडाशय कर्करोग (ओव्हरी कॅन्सर), दोनदा त्वचेचा कर्करोग आणि काखेच्या गाठीचा कर्करोग. कर्करोग शरीरात आणखी पसरू नये यासाठी तिला स्तन, अंडाशय शरीरापासून वेगळं करावं लागलं. ज्यामुळं प्रगतीनं आपलं स्त्रीत्वंही गमावलं, कॅन्सर,/कर्करोग या आजाराशी लढा देणारे रुग्ण अतिशय कठीण परिस्थितीतून जात असतात, केमोथेरपी, रेडियेशन आणि सर्जरीतून जाताना रुग्णांना तीव्र वेदना होत असतात, उपचाराचा भाग असल्यामुळे त्याला काही पर्याय नसतो. प्रगतीला अनेकदा कॅन्सर झाल्यानं वारंवार केमोथेरपी घ्यावी लागते, यासाठी लागणारं केमोपॉडही पुढील 5 वर्षांसाठी तिच्या हृदयाला जोडलेलं आहे. वाचा - काय आहे पार्किन्सन्स आजार? डॉक्टरांकडून जाणून घ्या याची लक्षणं आणि उपचार पद्धती प्रगतीचे वडील किरण धामणकर हे शिवसैनिक होते, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक यांच्यासोबत त्यांनी कामही केलं, त्यांचीच लेक प्रगती आता मदतीची हाक देतेय. ऑल इंडिया रेडियोवर तिच्या संघर्षाबद्दल तिची मुलाखत घेतली, तिच्या जिद्दीबद्दल तिला अनेक पुरस्कारही दिलेत आतासुद्धा न खचता ती आयुष्य जगतेय. ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर आणि आता स्कीन कॅन्सर झाल्याने तिला सतत उपचार, औषधंखरेदीसाठी आपले पैसे आणि वेळ खर्च करावा लागतोय, पैसे उभे करायचे म्हणून उपचारातून वेळ काढून ती पार्ट टाईम जॉबही करतेय. मात्र, कर्ज फेडण्यासाठीची रक्कम ती जमा करू शकली नाही. जन्मापासून आपल्या नातेवाईकांना आजारांशी लढताना तिनं पाहिलंय, तीन वेळा कर्करोगाची लागण झाली तरी मनानं ती खंबीर आहे, टाटा आणि केईएम रग्णालयातील डॉक्टरांनी तिला कॅन्सर उपचारांसोबत मानसिक बळ वाढवण्याचे उपचारही दिलेत. ज्यामुळे ती आजही खचून न जाता फक्त आणि फक्त लढतेय. चार दिवसात तिच्या डोक्यावरील छतही निघून जाणारे आहे, अशा परिस्थितीत प्रगतीला मदतीची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या