जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय आहे पार्किन्सन्स आजार? डॉक्टरांकडून जाणून घ्या याची लक्षणं आणि उपचार पद्धती

काय आहे पार्किन्सन्स आजार? डॉक्टरांकडून जाणून घ्या याची लक्षणं आणि उपचार पद्धती

काय आहे पार्किन्सन्स आजार? डॉक्टरांकडून जाणून घ्या याची लक्षणं आणि उपचार पद्धती

हा आजार झालेल्या रुग्णाला शारीरिक हालचाली करताना अडचणी जाणवतात. गेल्या काही वर्षांत या आजारावर आणि त्याच्या उपचारपद्धतीवर भरीव संशोधन झालं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 एप्रिल : पार्किन्सन्स हा मेंदूशी संबंधित एक न्यूरोडिजनरेटिव्ह विकार आहे. हा आजार झालेल्या रुग्णाला शारीरिक हालचाली करताना अडचणी जाणवतात. गेल्या काही वर्षांत या आजारावर आणि त्याच्या उपचारपद्धतीवर भरीव संशोधन झालं आहे. बेंगळुरूतल्या मणिपाल रुग्णालयाचे पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर क्लिनिकचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत एल.के. यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पार्किन्सन्स विकारावर इलाज आहे का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. गेल्या साठहून अधिक वर्षांत पार्किन्सन्स आजाराच्या उपचारपद्धतीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जगभरातल्या लाखो रुग्णांच्या जीवनमानात मोठी सुधारणा झाली आहे. पूर्वी या आजारावर थेरपी किंवा औषधं फारशी उपलब्ध नव्हती. आता औषधं, इलेक्ट्रिक शॉक, इंजेक्शन्स, शस्त्रक्रिया आणि औषधांच्या मदतीनं उपचार शक्य आहेत. एखाद्या अवयवाला कंप सुटणं किंवा अवयव थरथरणं हे या विकाराचं सर्वसामान्य लक्षण आहे. तथापि, पार्किन्सन्स आजारात शारीरिक हालचालींसंदर्भात लक्षणं दिसतात. याला मोटर सिम्प्टम्स म्हणतात. नॉन-मोटर सिम्प्टम्समध्ये शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम झाल्याचं दिसतं. सहज ओळखता येतील अशा शास्त्रीय मोटर लक्षणांमध्ये थरथरणं, स्नायूंचा कडकपणा, दैनंदिन कामात संथपणा आणि चालण्यात बदल होणं यांचा समावेश आहे. ही लक्षणं सर्वांनाच सहजपणे ओळखू येतात. या विकाराची काही लक्षणं आणि नॉन मोटर सिम्प्टम्स सहजपणे दिसत नाहीत. नॉन मोटर सिम्प्टम्समध्ये वारंवार मूड बदलणं, वासाची क्षमता जाणं, झोपेची समस्या (यात वारंवार स्वप्न पडणं, विस्कळित झोप, स्वप्नं), बद्धकोष्ठता, सेक्शुअल डिस्फंक्शन यांचा समावेश असतो. या सर्व लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पार्किन्सन्स आजारासंबंधी गैरसमज कमी करण्यासाठी वर्षानुवर्षं सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पार्किन्सन्स विकाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. जेम्स पार्किन्सन्स यांच्या जन्मदिवसानिमित्त दरव र्षी 11 एप्रिल हा दिवस जागतिक पार्किन्सन्स विकार जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. जेम्स पार्किन्सन्स यांनी 1817मध्ये या विकाराचं तपशीलवार वर्णन केलं होतं. त्यामुळे हा विकार त्यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. इतर अनेक आजारांप्रमाणे, पार्किन्सन्स विकारावरही चांगले उपचार पर्याय उपलब्ध आहेत. पार्किन्सन्स व्यवस्थापनात व्यायाम आणि आनंदी जीवनशैली हा महत्त्वाचा घटक आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात लेव्होडोपा, डोपामाइन अ‍ॅगोनिस्ट यांसारखी तोंडावाटे दिली जाणारी औषधं आणि चांगला व्यायाम पुरेसा ठरतो. जसजशी वेळ पुढे जाते, तसतशा अधिक स्थिर फेज थेरपीची आवश्यकता असते. या टप्प्यात सातत्याने डोपामिनार्जिक स्टिम्युलेशन थेरपीज दिल्या जातात. यात डीप ब्रेन स्टिम्युलेशन थेरपी, अपोमॉर्फिन पंप थेरपी, लेवोडोपा कार्बिडोपा इंटेस्टिनल जेल इन्फ्युजन थेरपीचा समावेश आहे. यापैकी बहुतांश थेरपीज भारतात उपलब्ध आहेत. पार्किन्सन्सवरच्या उपचारांच्या शोधामुळे आजाराच्या व्यवस्थापनासाठी विविध प्रमुख वैज्ञानिक संकल्पनांमध्ये बदल झाला आहे. सध्या पार्किन्सन्सचं व्यवस्थापन हळूहळू सर्वांना समान औषधं किंवा डोस देण्याच्या संकल्पनेपासून वैयक्तिक काळजी घेण्याच्या संकल्पनेपर्यंत पोहोचलं आहे. काही विशिष्ट व्यक्ती उपचारांना इतरांपेक्षा भिन्न प्रतिसाद का देतात किंवा विशिष्ट व्यक्तींमध्ये लक्षणं का वाढतात आणि प्रगती कमी का होते हे जेनेटिक्सच्या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना समजू शकतं. त्यामुळे योग्य रुग्णांसाठी योग्य औषधं निवडण्यास मदत होते. याशिवाय, सध्या विशिष्ट जनुकबदल थेरपीजबाबत चाचण्या केल्या जातात. (उदा. LRRK2 म्युटेशन आणि रुग्णांमधलं GBA म्युटेशन) यामुळे जागतिक स्तरावर भारतासह विविध देशांतल्या नागरिकांच्या जनुकीय उत्परिवर्तनांची सूची तयार करण्यात यश आलं आहे. पार्किन्सन्स आजाराच्या व्यवस्थापनातल्या संभाव्य औषधांच्या निर्मितीची ही प्रमुख पायरी आहे. येत्या काही दशकांमध्ये आपण पार्किन्सन्स विकार असलेल्या रुग्णांसाठी लक्षणात्मक उपचारांकडून थेरपीशी निगडीत उपचारांकडे वळू, अशी आशा आहे. जागतिक पार्किन्सन्स विकार दिनानिमित्त, या विकाराबद्दल अधिक जागरूकता निर्माण करू या आणि हा विकार झालेल्या रुग्णांचं जीवनमान सुधारण्यात मदत करू या. www.movementdisordersclinic.com च्या माध्यमातून याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट एकत्र आला आहे. या आजाराविषयीच्या इतर अनेक उपक्रमांची माहिती येथे उपलब्ध आहे. गरजू रुग्ण उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम तज्ज्ञांकडून त्यांना आवश्यक असलेली मदत मिळवू शकतात. इतर अनेक आजारांप्रमाणे, पार्किन्न्स विकारावरही चांगले उपचार पर्याय उपलब्ध आहेत. पार्किन्सन्स व्यवस्थापनात व्यायाम आणि आनंदी जीवनशैली हा महत्त्वाचा घटक आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात लेव्होडोपा, डोपामाइन अ‍ॅगोनिस्ट यांसारखी तोंडावाटे दिली जाणारी औषधं आणि चांगला व्यायाम पुरेसा ठरतो. जसजशी वेळ पुढे जाते, तसतशा अधिक स्थिर फेज थेरपीची आवश्यकता असते. या टप्प्यात सातत्याने डोपामिनार्जिक स्टिम्युलेशन थेरपीज दिल्या जातात. यात डीप ब्रेन स्टिम्युलेशन थेरपी, अपोमॉर्फिन पंप थेरपी, लेवोडोपा कार्बिडोपा इंटेस्टिनल जेल इन्फ्युजन थेरपीचा समावेश आहे. यापैकी बहुतांश थेरपीज भारतात उपलब्ध आहेत. पार्किन्सन्सवरच्या उपचारांच्या शोधामुळे आजाराच्या व्यवस्थापनासाठी विविध प्रमुख वैज्ञानिक संकल्पनांमध्ये बदल झाला आहे. सध्या पार्किन्सन्सचं व्यवस्थापन हळूहळू सर्वांना समान औषधं किंवा डोस देण्याच्या संकल्पनेपासून वैयक्तिक काळजी घेण्याच्या संकल्पनेपर्यंत पोहोचलं आहे. काही विशिष्ट व्यक्ती उपचारांना इतरांपेक्षा भिन्न प्रतिसाद का देतात किंवा विशिष्ट व्यक्तींमध्ये लक्षणं का वाढतात आणि प्रगती कमी का होते हे जेनेटिक्सच्या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना समजू शकतं. त्यामुळे योग्य रुग्णांसाठी योग्य औषधं निवडण्यास मदत होते. याशिवाय, सध्या विशिष्ट जनुकबदल थेरपीजबाबत चाचण्या केल्या जातात. (उदा. LRRK2 म्युटेशन आणि रुग्णांमधलं GBA म्युटेशन) यामुळे जागतिक स्तरावर भारतासह विविध देशांतल्या नागरिकांच्या जनुकीय उत्परिवर्तनांची सूची तयार करण्यात यश आलं आहे. पार्किन्सन्स आजाराच्या व्यवस्थापनातल्या संभाव्य औषधांच्या निर्मितीची ही प्रमुख पायरी आहे. येत्या काही दशकांमध्ये आपण पार्किन्सन्स विकार असलेल्या रुग्णांसाठी लक्षणात्मक उपचारांकडून थेरपीशी निगडीत उपचारांकडे वळू, अशी आशा आहे. जागतिक पार्किन्सन्स विकार दिनानिमित्त, या विकाराबद्दल अधिक जागरूकता निर्माण करू या आणि हा विकार झालेल्या रुग्णांचं जीवनमान सुधारण्यात मदत करू या. www.movementdisordersclinic.com च्या माध्यमातून याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट एकत्र आला आहे. या आजाराविषयीच्या इतर अनेक उपक्रमांची माहिती येथे उपलब्ध आहे. गरजू रुग्ण उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम तज्ज्ञांकडून त्यांना आवश्यक असलेली मदत मिळवू शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात