JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईमध्ये फिरतेय खतरनाक व्यक्ती; 'एनआयए'कडून अलर्ट जारी!

मुंबईमध्ये फिरतेय खतरनाक व्यक्ती; 'एनआयए'कडून अलर्ट जारी!

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील एक मेल एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे.

जाहिरात

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी : सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील एक मेल एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये पोलिसांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तान या देशात प्रशिक्षण घेतलेला एक हस्तक मुंबईत आला आहे. सरफराज मेमन असं या संशयिताचं नाव असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. संशयित इंदोरचा असल्याचा दावा सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एनआयएकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जो मेल आला आहे, त्या मेलमध्ये सरफराज हा मध्यप्रदेशमधील इंदोरचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत आता मध्यप्रदेश सरकारला देखील माहिती देण्यात आली आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे लायन्स, परवाना, व्हिसा यासह आधार कार्डची प्रतही मुंबई पोलिसांना मेल करण्यात आली आहे. या मेलनंतर संबंधित व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे. डोंबिवलीकरांना मोठा दिलासा, आता अवघ्या 20 मिनिटांत पोहोचा ठाण्याला! यापूर्वीही हल्ल्यासंदर्भात मेल दरम्यान यापूर्वी देखील दोनदा दहशतवादी हल्ल्याबाबतचे संदेश मिळालेले आहेत. पहिला मेल हा फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात एनआयएला मिळाला होता. या मेलचा शोध घेतला असता हा मेल पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाले. मेलमध्ये सीआयएचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले होते. तर दुसरा संदेश हा मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानच्या एका नंबरवरून प्राप्त झाला होता. ज्यामध्ये मुंबईमध्ये पुन्हा 26/11 सारखा हल्ला होणार असल्याचं म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या