JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सांगोल्यात भीषण अपघात! दोन मोटारसायकल-ट्रॅक्टरच्या तिहेरी धडकेत 3 जण ठार

सांगोल्यात भीषण अपघात! दोन मोटारसायकल-ट्रॅक्टरच्या तिहेरी धडकेत 3 जण ठार

सांगोला तालुक्यात झालेल्या एका भीषण (Accident Near Sangola) अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू (3 Killed in Accident) झाला आहे. शनिवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 28 फेब्रुवारी: सांगोला तालुक्यात झालेल्या एका भीषण (Accident Near Sangola) अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू (3 Killed in Accident) झाला आहे. शनिवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कासेगाव याठिकाणी राहणाऱ्या अक्षय पडळकर आणि भीमराव पडळकर (वय 65) यांचा समावेश आहे. अवघ्या 22 वर्षांच्या अक्षयच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकाकुल आहे. सांगोला तालुक्यात हा भीषण अपघात घडला. याठिकाणी चिकमहूद पाटीजवळ तिहेरी अपघात झाला. दोन मोटारसायकल आणि ट्रॅक्सच्या धडकेत तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय या दुर्घटनेमध्ये आणखी दोघेजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातील जखमी देखील पंढरपूर तालुक्यातील आहेत. बातमी अपडेट होत आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या