JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नितेश राणेंनी दिलं उद्धव ठाकरेंना Valentines Day गिफ्ट, म्हणाले....

नितेश राणेंनी दिलं उद्धव ठाकरेंना Valentines Day गिफ्ट, म्हणाले....

अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वीच दौरा सिंधुदुर्गाचा दौरा केला होता. त्यानंतर नितेश राणे यांचे 7 समर्थकांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेऊन एकच जोरदार धक्का दिला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंधुदुर्ग, 09 फेब्रुवारी :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमध्ये 7 नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘व्हॅलेंटाईन डे तोंडावर आहे, शिवसेना हे आमचे जुने प्रेम आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी 7 नगरसेवकांचा स्वीकार करावा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वीच दौरा सिंधुदुर्गाचा दौरा केला होता. त्यानंतर नितेश राणे यांचे 7 समर्थकांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेऊन एकच जोरदार धक्का दिला आहे. याबद्दल नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘आमचे काही नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर आहे, याचे वृत्त वाचले. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आले आहे. शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे. त्यामुळे जुने प्रेम विसरले नाही पाहिजे, असं म्हटलं जात असते. त्यामुळे आमच्याकडील 7 नगरसेवक तिकडे जात आहे.’

संबंधित बातम्या

तसंच ‘वैभववाडी नगरपंचायतीमध्य शिवसेनेची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडे कोणताही नवा उमेदवार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पहिल्यापासून प्रेम करतो. त्यांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये म्हणून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सात नगरसेवक भेट म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवत आहोत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा, असंही नितेश राणे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या 7 जणांसह माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा समावेश आहे. नितेश राणे कालपर्यंत त्यांच्या परिवारावर दबाव टाकत होते, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. गेल्या 5 वर्षांपासून नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे 7 नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष असे मिळून 9 जण शिवसेनेत प्रवेश करणार आहे.  गेल्या 5 वर्षांत नितेश राणे जी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली नाही, त्यांची कार्यपद्धती चुकीची होती. नगरपरिषद ही पहिल्यांदा झाली होती. पण तिचा विकास नितेश राणे करू शकले नाही, अशी टीका सतीश सावंत यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या