JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Politics : पुन्हा नवा सर्व्हे, मुख्यमंत्रिपदी फडणवीसांना पसंती, भाजपला इतक्या जागा मिळणार!

Maharashtra Politics : पुन्हा नवा सर्व्हे, मुख्यमंत्रिपदी फडणवीसांना पसंती, भाजपला इतक्या जागा मिळणार!

महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणता पक्ष बाजी मारेल याबद्दलचा एक सर्व्हे समोर आलाय.

जाहिरात

आज विधानसभा निवडणुका झाल्या तर...नवा सर्व्हे समोर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून : राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून आगामी निवडणूकांची जोरदार पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी राजकीय पक्षांमध्ये हलचालींना वेग आलाय. यादरम्यान महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणता पक्ष बाजी मारेल याबद्दलचा एक सर्व्हे समोर आलाय. ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रामध्ये भाजपला तब्बल सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला सर्वाधिक 123 ते 129 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शिवसेना आणि भाजप युती बहुमताचा आकडा सहज पार करतील असंही हा सर्व्हे सांगतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56 आणि काँग्रेसला 50 ते 53 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे, तर उद्धव ठाकरेंच्या गटाला अवघ्या 17 ते 19 जागा मिळतील असं सर्व्हे सांगतोय. अपक्ष आणि इतर पक्षांना 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण या अपक्षांचा कलही बहुतांश भाजपकडे असेल असं बोललं जातंय. मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? देवेंद्र फडणवीस - 35 टक्के अशोक चव्हाण- 21 टक्के अजित पवार- 21 टक्के एकनाथ शिंदे- 12 टक्के उद्धव ठाकरे- 9 टक्के इतर- 9 टक्के कुणाला किती जागा? भाजप- 123 ते 129 शिवसेना- 25 राष्ट्रवादी- 55 ते 56 काँग्रेस- 50 ते 53 ठाकरे गट- 17 ते 19 अपक्ष- 12 कोकण विभाग भाजप- 29 ते 33 शिवसेना- 11 ठाकरे गट- 14 ते 16 काँग्रेस- 5 ते 6 राष्ट्रवादी- 7-8 अपक्ष- 5 मुंबई विभाग (एकूण जागा 36) भाजप- 16 ते 18 शिवसेना- 2 ठाकरे गट- 9 ते 10 काँग्रेस- 5 ते 6 राष्ट्रवादी- 1 अपक्ष- 1 पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 58) भाजप 22 ते 23 शिवसेना- 1 राष्ट्रवादी- 23 काँग्रेस- 9 ते 10 ठाकरे गट- 1 अपक्ष- 1 मराठवाडा (एकूण जागा 46) भाजप 19 शिवसेना 5 राष्ट्रवादी 9 काँग्रेस 10 ठाकरे गट 2 अपक्ष 1 उत्तर महाराष्ट्र/ खान्देश (एकूण जागा 47) भाजप 23 शिवसेना 3 राष्ट्रवादी 14 काँग्रेस 6 ठाकरे गट 0 अपक्ष 1 विदर्भ ( एकूण जागा 62) भाजप 30 ते 31 शिवसेना 5 राष्ट्रवादी 2 काँग्रेस 20 ते 21 ठाकरे 0 अपक्ष 4

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या