मुंबई, 07 मार्च: मराठी भाषा दिनाच्या (Marathi Bhasha Din) पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कात (Shivaji Park) एका आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समोर प्रचंड गर्दी असतानाही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क का लावला नाही, या पत्रकाराच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी बेधडक उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय, असं म्हणत राज यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (ncp spokeperson) क्लाईट क्रास्टो (clyde crasto) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलं पत्र (Open Letter) लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरे यांना मास्क परिधान करण्याची विनंती केली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर टीका न करता एक चाहता आणि प्रशंसकाच्या रुपात काळजीपोटी विनंती करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भल्याही आपल्या राजकीय विचारधारा सारख्या नसतील, पण तुमच्या भाषण कौशल्यामुळे आणि व्यंग्य चित्रमुळे मी तुमच्याशी जोडला गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खरंतर देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शिवाय देशातील निम्मे कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आणि केरळ या राज्यात आढळत आहेत. देशात अशी स्थिती असताना, राज ठाकरे यांनी सार्वजानिक ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करणं, सार्वजानिक हित्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते, कारण राज ठाकरेंचे लाखों चाहते, कार्यकर्ते त्यांना डोळे झाकून फोल्लो करतात. अशा परिस्थित राज raठाकरे यांनी ‘मी मास्क घालतचं नाही’ असं म्हणणं सार्वजानिक आरोग्यासाठी हितावह नाहीये, अशा आशयाचं खुलं पत्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लिहिलं आहे.
हे ही वाचा- सर तुम्ही मास्क का नाही लावला? पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं बेधडक उत्तर राजसाहेब, तुम्ही लोकांसाठी एक प्रेरणा आहात, आपण जे बोलता त्या प्रत्येक शब्दाचं पालन आणि अनुकरण केलं जातं. आपला एका मोठा चाहता वर्ग आहे. आपण त्यांचे गुरू, मित्र आणि मार्गदर्शक आहात. आपली भाषणं केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशात पाहिली जातात. त्यामुळे कोविड विरुद्धच्या लढाईत आपली भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, की राजसाहेब तुम्ही मास्क घाला. केवळ तुमच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर देशातील इतर नागरिकांसाठीही एक उदाहरण ठेवा, असंही क्रास्टो यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. त्याचं हे पत्र सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.