JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Ministers bungalow: राष्ट्रवादीच्या नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप; पाहा 'वजनदार' बंगला कुणाच्या वाट्याला

Maharashtra Ministers bungalow: राष्ट्रवादीच्या नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप; पाहा 'वजनदार' बंगला कुणाच्या वाट्याला

Allotment of bungalows to newly appointed ministers in Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांसाठी शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे.

जाहिरात

राष्ट्रवादीच्या नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता खाते, कार्यालय आणि शासकीय निवास्थानांचं वाटप सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्याने शपथ घेतलेल्या 7 मंत्र्यांना आज बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेच्या महिनाभरानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला. अद्याप खातेवाटप जाहीर झाले नाही. मात्र, आता राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना शासकीय बंगले/ निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यावर ज्याप्रकारे मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी आणि फिल्डिंग लावली जाते. त्याचप्रकारे मंत्री झाल्यावर आपल्या आवडता बंगला मिळावा यासाठीही अनेकजण आग्रही असतात. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर आता कोणता बंगला कोणत्या मंत्र्याला मिळणार यावरुन काही दिवसांपासून चर्चा रंगत होती. अखेर राज्य शासनाने शासन निर्णय काढत बंगल्याचे / शासकीय निवासस्थानाचे वाटप केले आहे. नव्या मंत्र्यांसाठी शासकीय निवासस्थान मंत्री छगन भुजबळ बी-6 मंत्री हसन मुश्रीफ - विशाल गड मंत्री दिलीप वळसे पाटील - सुवर्ण गड मंत्री धनंजय मुंडे - प्रचित गड मंत्री धर्मराव बाबा - सुरूचि 3 मंत्री अनिल भाईदास पाटील - सुरूची 8 मंत्री संजय बनसोडे - सुरूचि 18 वाचा - शरद पवारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींना खोचक सवाल, म्हणाले… अजित पवारांसह त्यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेवून आठवडा उलटला आहे. पण, या मंत्र्यांच्या खातेवाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं गेलं, पण त्यांना कुठलं खातं मिळणार यापेक्षा जास्त अजित पवार मंत्रालयात कुठे बसणार? त्यांचं कार्यालय सहाव्या मजल्यावर कार्यालय मिळणार की दुसऱ्या कुठल्या मजल्यावर? याबाबत आता शासन आणि प्रशासनाकडून चर्चा सुरू आहे. अशातच इतर मंत्र्यांना मंत्रालयामध्ये दालन वाटप करण्यात आले आहे. असं आहे नव्या मंत्र्यांची मंत्रालयात दालनं छगन भुजबळ - २०१ नंबर दालन दुसरा मजला हसन मुश्रीफ - ४०७ नंबरचे दालन, ४ मजला दिलिप वळसे पाटील - ३०३ नंबर दालन, तिसरा मजला धनंजय मुंडे - २०१ ते २०४ आणि २१२ नंबरचे दालन, दुसरा मजला धर्मराव बाबा आत्राम, ६०१, ६०२ व ६०४, सहावा मजला आदिती तटकरे, दालन नंबर १०३, मुख्य इमारत अनिल पाटील - दालन नंबर ४०१, ४ मजला, मुख्य मंत्रालय इमारत संजय बनसोडे, दालन नंबर ३०१ , मुख्य मंत्रालय इमारत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या