JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फ्लॅट जप्ती प्रकरणावर धनंजय मुंडेंचा खुलासा!

फ्लॅट जप्ती प्रकरणावर धनंजय मुंडेंचा खुलासा!

कर्जाच्या हफ्त्यांची परतफेड करू शकले नसल्यामुळे बँकेने मुंडे यांच्या फ्लॅटवर जप्ती आणली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरेश जाधव, परळी 28 ऑक्टोंबर : फ्लॅट जप्ती प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी खुलासा केलाय. केवळ राजकीय फायद्यासाठी असे विषय उकरून काढले जात जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पुण्यातल्या फ्लॅटवर कुणीच नाही कुणी तरी बळच नोटीस देऊन गेले आहे असं मुंडे यांनी स्पष्ट केलं. कर्जाच्या हफ्त्यांची परतफेड करू शकले नसल्यामुळे बँकेने मुंडे यांच्या फ्लॅटवर जप्ती आणल्याने राजकीय चर्चेंना उधाण आलं होतं. मुंडे म्हणाले, मी निवडणुकीत व्यस्त आहे असल्याने निवडणूक झाल्या नंतर कर्जाचा जो काही विषय आहे तो सेटल करू असे मी बँकांच्या अधिकाऱ्यांना  कळवले होतं, आता या विषयात मी लक्ष घालेन असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ‘…अन् पंक्चर झालेली गाडी 105 च्या स्पीडने सुसाट’, खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट मुंडे पुढे म्हणाले, ह्या संदर्भात काय करायचं आहे ते अजून मी ठरवलेलं नाही, या विषयी मी लवकरच काय करायच ते बघेन. मला बदनाम करण्यासाठी अश्या पद्धतीने काही ना काही विषय काढले जात आहेत. बँकेचं एकूण कर्ज 78 लाख रुपयांच आहे आणि तीन महीन्याची डीफाल्ट  रक्कम आहे ती 22 लाख रुपये आहे. ही कारवाई का केली हे मला अजूनही माहीत नाही.  जप्तीची नोटीस का पाठवली.  ह्यात अजून काही विषय आहे हे अजून मला समजून घय्याचा आहे असंही ते म्हणाले.

राज्याच्या राजकारणात ट्विस्ट, सेनेच्या भूमिकेमुळे शरद पवार भाजपसाठी ‘गेमचेंजर’?

नेमकं काय झालं? पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेनं कारवाई केली आहे. त्यांचा फ्लॅट बँकेनं ताब्यात घेतला आहे. तर हा राजकीय कट असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने शुक्रवारी एक जाहिरात दिली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी इथल्या युगाई ग्रीन सोसायटीमध्ये धनंजय मुंडे यांच्या नावावर असलेल्या फ्लॅटवर जप्ती आणल्याचे म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनिल भोसले यांच्याच नियंत्रणात ही बँक होती. याबाबतचे वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. एनपीएमधील फुगवट्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते. तसेच ऑक्टोबरमध्ये बँकेचं संचालक मंडळही बरखास्त कऱण्यात आलं होतं. सध्या या बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या